OMG !! Ileana Dikruz looking to leoplock with Boyfriend! | OMG!! ​बॉयफ्रेन्डसोबत ‘लिपलॉक’ करताना दिसली इलियाना डिक्रूज!

इलियाना डिक्रूझ म्हणजे बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री. इलियाना कधीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल फार काही लपवताना दिसत नाही. त्यामुळेच इलियानाच्या आयुष्यात प्रेम आले आणि तिने ते सगळ्यांसमोर मान्य केले. आपल्या बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो शेअर करतानाही ती जराही संकोचत नाही. आत्ताही इलियानाने बॉयफ्रेन्ड अ‍ॅन्ड्र्यू नीबोनसोबतचा असाच एक ‘रोमॅन्टिक’ क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.गेल्या काही दिवसांपासून इलियाना कमालीची बिझी आहे. पण इतक्या बिझी शेड्यूलमधूनही वेळ काढत इलियाना अलीकडे आपल्या प्रियकराला भेटायला पोहोचली.  या भेटीत अ‍ॅन्ड्र्यूवरचे स्वत:चे प्रेम व्यक्त करण्यात तिने कुठलीही कंजूषी केली नाही. बातमीसोबतचा इलियाना व अ‍ॅन्ड्र्यूचा ताजा फोटो याचा पुरावा आहे. हा फोटो इलियानाने  इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ‘एका वेगळ्याच दुनियेतील तो क्षण’ असे कॅप्शन दिले आहे. इलियाना व अ‍ॅन्ड्र्यूचा हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील रोमॅन्टिक क्षण आठवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आयुष्यातील रोमॅन्टिक  क्षण आठवाच. पण इलियाना व अ‍ॅन्ड्र्यूचा हा फोटो तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका.
इलियानाचा बॉयफ्रेन्ड अ‍ॅन्ड्र्यू एक फोटोग्राफर आहे. आॅस्ट्रेलियात राहणा-या अ‍ॅन्ड्र्यूला इलियानाचे फोटो काढणे आवडते. इलियानाचे अनेक फोटो त्याने काढले आहेत. विशेष म्हणजे, इलियानाने यापैकी अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी इलियानाचा बाथटममधील न्यूड फोटो चांगलाच गाजला होता. अ‍ॅन्ड्र्यूनेच तिचे हे हॉट फोटोशूट केले होते. सध्या या दोघांची लव्हस्टोरी जोरात आहे. मध्यंतरी या लव्हबर्ड्सनी गूपचूप लग्न केल्याची बातमी आली होती. अर्थात ही बातमी निव्वळ अफवा ठरली होती 

ALSO READ : कुणावर इतकी भडकली इलियाना डिक्रूज? काय आहे कारण?

२०१२ मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर रूस्तम, मैं तेरा हिरो, मुबारका अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. अलीकडे इलियानाचा ‘बादशाहो’ रिलीज झाला होता. यात ती अजय देवगणच्या अपोझिट दिसली होती. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवली नाही. पण यातील इलियानाच्या भूमिकेचे मात्र चांगलेच कौतुक झाले होते.
Web Title: OMG !! Ileana Dikruz looking to leoplock with Boyfriend!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.