OMG! Deepika Padukone falls heavily on Niya Sharma !! | OMG! ​दीपिका पादुकोणवर भारी पडली निया शर्मा!!

दीपिका पादुकोणचे ‘स्टार्स’ सध्या चांगले नाहीत, असे म्हणायचे का? होय, कारणही तसेच आहे. दीपिकाचा ‘पद्मावती’ वादात सापडला आहे. इतका की आता तो कधी रिलीज होईल, हेही ठाऊक नाही. केवळ रिलीजचं नाही तर ‘पद्मावती’त राणी पद्मावतीची भूमिका साकारल्यामुळे दीपिकाचा जीवही धोक्यात आला आहे. ( या चित्रपटाला विरोध करणाºयांनी दीपिकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.) इतके कमी की काय, म्हणून आता ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या किताबाने दीपिकाला हुलकावणी दिली आहे. विशेष म्हणजे एका टीव्ही अभिनेत्रीने यात दीपिकाला मात दिली आहे. गतवर्षी ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत दीपिका पहिल्या क्रमांकावर होती. प्रियांका चोप्राला मागे टाकून तिने हा अव्वल क्रमांक पटकावला होता. पण यंदा प्रियांकाने पुन्हा एकदा दीपिकाला पछाडत या अव्वल स्थानावर कब्जा मिळवला आहे.आता प्रियांका क्रमांक १ वर गेली तर दीपिका क्रमांकावर राहणे अपेक्षित होते. पण नाही, दीपिका थेट तिस-या स्थानावर फेकली गेली. होय, दीपिकाला धक्का देत टीव्ही अभिनेत्री निया शर्मा हिने ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.  म्हणजेच, दीपिकासारख्या आघाडीच्या अभिनेत्रीला एका टीव्ही अभिनेत्रीने मात दिली आहे. एकंदर काय तर एका टीव्ही अभिनेत्रीने दीपिकाला मात द्यावी, हे निश्चितच चांगले संकेत नाहीयेत.

ALSO READ : निया शर्माने लावले निळ्या रंगाचे लिपस्टिक ! लोकांनी म्हटले ‘पोर्नस्टार’!!

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. गतवर्षी ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिसºया स्थानावर होती. पण यंदा मात्र तिने तिसºया स्थानावरून दुसºया स्थानावर उडी घेतली आहे.लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ५०‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली आहे.

Web Title: OMG! Deepika Padukone falls heavily on Niya Sharma !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.