OMG! Bobby Deol, what did he do? | OMG! ​बॉडी बनवण्याच्या नादात ‘हे’ काय करून बसला बॉबी देओल!!

सध्या बॉबी देओल ‘रेस3’ चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटासाठी बॉबी विशेष मेहनत घेतोय. कारण हा चित्रपट बॉबीसाठी खूप महत्त्वाचा आहे. करिअर संपणार, असे वाटत असताना बॉबीला हा चित्रपट मिळाला.  या चित्रपटात सलमान खान आहे. त्यामुळे सलमानच्या मदतीने म्हणा वा स्वबळावर म्हणा, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करणे बॉबीला भाग आहे. साहजिक बॉबी यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. तूर्तास सांगायचे तर ‘रेस3’साठी बॉबी त्याच्या फिजीकवर विशेष लक्ष देतोय. सलमान खानच्या सल्ल्यानुसार, बॉबीने म्हणे बॉडी बनवणे सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी बॉबीने जिममधील आपले काही फोटोही शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना बॉबीने सलमानचे आभारही मानले होते. एकंदर काय तर सलमानचा सल्ला बॉबीने मनावर घेत, जिममध्ये घाम गाळणे सुरु केले होते. आता त्याचा परिणाम तर बघायलाच हवा. होय, यासाठी बॉबीचे ताजे फोटो तुम्ही बघायला हवे. आम्ही बॉबीचे हे ताजे फोटो बघितले. पण हे फोटो बघितल्यावर आम्हाला मोठा धक्का बसला. कारण या फोटोत बॉबीच्या बॉडीचा शेप काही वेगळाच दिसतोय.  चर्चा खरी मानाल तर, सलमानसारखी बॉडी बनवण्याच्या नादात बॉबीने स्वत:चे फिजीक बिघडवले आहे. बॉबीचे हे ताजे फोटो वरूण शर्माच्या बर्थ डे पार्टीतील आहेत.  ‘फुकरे’ स्टार वरूण शर्माने बॉबीला बर्थ डे पार्टीचे निमंत्रण दिले होते. या पार्टीत बॉबी व्हाईट टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घालून दिसला होता. पण त्याच्या बॉडीचा शेप मात्र बºयाचअंशी ‘विचित्र’ होता.
बॉबी दीर्घकाळानंतर श्रेयस तळपदेच्या ‘पोस्टर ब्यॉयज’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये परतला होता. यानंतर त्याला सलमान खानने ‘रेस3’ आॅफर केला. या चित्रपटानंतर बॉबी पिता धर्मेन्द्रसोबत ‘यमला पगला दीवाना2’मध्ये दिसणार आहे.

ALSO READ :   चहा पिता पिताच तान्याच्या प्रेमात पडला बॉबी देओल; वाचा त्याची लव्हस्टोरी!

‘बरसात’, ‘गुप्त’, ‘सोल्जर’, ‘बिच्छू’ यासारख्या गाजलेल्या सिनेमांचा  नायक राहिलेला बॉबी गत दहा वर्षांपासून  कामाच्या शोधात होता. परंतु या काळात त्याला एकही चित्रपट मिळाला नाही.  अशा स्थितीत  बेरोजगार ठरलेल्या बॉबीने   दिल्लीच्या आरएसव्हीपी क्लबमध्ये डीजेचे काम सुरू केल्याची खबर होती. अर्थात बॉबीने ही खबर नाकारली होती.  
Web Title: OMG! Bobby Deol, what did he do?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.