OMG! 'Bahubali' Prabhas got tired of 'Action'! Read detailed ... !! | OMG! ‘बाहुबली’ प्रभासला आला ‘अ‍ॅक्शन’चा कंटाळा! वाचा सविस्तर...!!

‘बाहुबली’ प्रभास सध्या ‘साहो’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.  ‘बाहुबली2’च्या अभूतपूर्व यशानंतर चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला प्रभास ‘साहो’मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. सध्या प्रत्येक दिग्दर्शक  प्रभासला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सूक आहे. अगदी करण जोहरपासून, साजिद नाडियाडवाला, वासू भगनानी, प्रभूदेवा असे सगळेच. पण कदाचित प्रभासचे प्लानिंग वेगळेच आहे. ‘साहो’ या थ्रीलर-अ‍ॅक्शनपटानंतर प्रभास म्हणे, अ‍ॅक्शनपटांपासून काही काळ ब्रेक घेणार आहे. होय, ‘बाहुबली: द बिगनींग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटानंतर ‘साहो’मध्येही प्रभास अ‍ॅक्शन करताना दिसणार असला तरी यात प्रभासला फारशी रूची राहिलेली नाही,असे दिसतेयं. त्यामुळेच ‘साहो’नंतर काही काळ प्रभास अ‍ॅक्शनपट न करता रोमॅन्टिक व लाईफ ड्रामा अर्थात वास्तववादी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवणार आहे. प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. रोमॉन्टिक, वास्तववादी अशा स्क्रिप्टचा त्यामुळे त्याला शोध असेल.
‘बाहुबली’ हा पीरियड ड्रामा होता. ‘साहो’ हा पीरियड ड्रामा नसला तरी अ‍ॅक्शनपट आहे. गेल्या सात वर्षांपासून प्रभास अशाच अ‍ॅक्शनपटांचा भाग राहिला आहे. पण सूत्रांच्या मते, आता प्रभासला बदल हवा आहे. स्वत:च्या युव्ही बॅनरखाली अशाच काही वेगळ्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट घेऊन येण्याचे प्रभासचे प्लानिंग आहे. हे प्लानिंग यशस्वी झालेच (अर्थात यशस्वी होणारच) तर   प्रभासचा एक नवा रोमॅन्टिक चेहरा येत्या काळात आपण पाहू शकू. आम्ही यासाठी प्रचंड एक्ससाईटेड आहोत. निश्चितपणे आमच्याइतकेच तुम्हीही उत्सूक असणार.

ALSO READ : ‘बाहुबली’ टीमसोबत रविना टंडनने रात्रभर केली पार्टी; अखेर काय असेल प्रकरण?

‘साहो’ या चित्रपटात स्वातंत्र्याचीपूर्वीची कथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा चित्रपट हिंदीसह इतर भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे. 
Web Title: OMG! 'Bahubali' Prabhas got tired of 'Action'! Read detailed ... !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.