OMG! Alia Bhatt !! | OMG ! ​ हे काय बोलून गेली आलिया भट्ट!!

आलिया भट्टने नुकताच आपला २५ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या सहा वर्षांच्या करिअरमध्ये आलियाने अभूतपूर्व यश मिळवले. आज आलिया बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. स्टाईलच्या बाबतीतही आलिया आघाडीवर आहे. अलीकडे आलियाला ‘मोस्ट स्टाईलिश अ‍ॅक्ट्रेस’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्वांचे आभार मानताना आलिया असे काही बोलून गेली की, सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. होय, आलिया मुलांबद्दल भलतेच बोलून गेली. ‘अलीकडे मी वयाची २५ वर्षे पूर्ण केलीत. हा माझ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. बॉईज गँगमध्ये मला जेव्हा केव्हा ‘मोस्ट स्टाईलिश अवार्ड’सारख्या पुरस्काराने गौरविण्यात येते,  तेव्हा निश्चितपणे एक वेगळा आनंद जाणवतो. मी सर्व मुलांना सांगू इच्छिते की, एक मुलगी जेव्हा मोठी होते, तेव्हा तिला महिला म्हटले जाते. पण मुलगे नेहमीच मुलगेच राहतात,’ असे आलिया यावेळी म्हणाली.आलिया हे वाक्य सहज बोलून गेली की, त्यामागे तिचा काही उद्देश असावा, हे आम्हाला ठाऊक नाही. केवळ आलियाच्या या वाक्याने एका नव्या वादाला हवा मिळू नये, इतकेच आम्हाला वाटते. 

ALSO READ : ​सिद्धार्थ मल्होत्राचा ‘पत्ता कट’! ‘आशिकी3’मध्ये आलिया भट्टसोबत वरूण धवनची वर्णी!!

तूर्तास आलिया ‘गल्ली बॉय’ आणि ‘ब्रह्मास्त्र’मध्ये बिझी आहे. तिचा ‘राजी’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा धर्मा प्रॉडक्शनचा आत्तापर्यंतचा सगळ्यांत मोठा चित्रपट आहे. या चित्रपटाचा बजेट १५० कोटींचा असल्याचे कळते. या चित्रपटात आलिया व रणबीर कपूर पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ‘गल्ली बॉय’मध्ये ती रणवीर सिंगसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल. आलियाने वरूण धवनसोबत ‘आशिकी3’ साईन केला, असेही ऐकिवात येतेय.  आलिया व वरूण या दोघांची फॅन फॉलोर्इंग बघून मेकर्सनी त्यांना ‘आशिकी3’ आॅफर केला, असे  कळतेयं. याआधी ‘स्टुडंट आॅफ द ईअर’,‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’, ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ अशा चित्रपटात ही जोडी दिसली आहे आणि प्रत्येकवेळी ती सुपरहिट ठरली आहे.  
Web Title: OMG! Alia Bhatt !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.