OMG !! Akshay Kumar was given the title 'only' by the international media! | ​OMG!! अक्षय कुमारला इंटरनॅशनल मीडियाने दिली ‘ही’ उपाधी!

नाही म्हणायला यावर्षाची सुरुवात बॉलिवूडसाठी चांगली राहिली. ‘रईस’ व ‘काबील’ या चित्रपटांचा बॉक्सआॅफिसवर संघर्ष रंगला. पण तरिही या चित्रपटाचे चांगला बिझनेस केला. पण यानंतर आलेले सगळे चित्रपट आपटले. एप्रिलच्या अखेरिस ‘बाहुबली2’ रिलीज झाला आणि या चित्रपटाच्या नेत्रदिपक यशापुढे बॉलिवूडच्या सगळ्या चित्रपटांचे भविष्य काळवंडले. सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ व शाहरूख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हे चित्रपटही दणकून आपटले. एकापाठोपाठ एक असे अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर बॉलिवूडला आता एका हिटची प्रतीक्षा आहे. साहजिकच अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाकडून बॉलिवूडला ब-याच अपेक्षा आहेत. 

केवळ भारतीय मीडिया वा बॉलिवूड जाणकारच नाही तर विदेशी मीडियाही अक्षयच्या या चित्रपटाकडे डोळे लावून बसला आहे आणि का बसू नये? इंटरनॅशनल मीडियाच्या नजरेत अक्षय कुमार ‘बॉलिवूडचा बँकर’ जो आहे. होय, एका मीडिया साईटने अक्षयला ‘बॉलिवूडचा बँकर’ ही उपाधी दिली आहे. ‘अक्षय कुमार बॉलिवूडचा बँकर आहे. तो एकापाठोपाठ एक अशा हिट चित्रपटांची रांग लावतो. रूस्तम, एअरलिफ्ट आणि जॉली एलएलबी२ याचे उदाहरण आहे,’ असे या साईटने लिहिले आहे.
अक्षयच्या ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाची म्हणूनच सर्वांना प्रतीक्षा आहे. ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा अक्षयचा चित्रपट अनेक देशांत रिलीज होतो आहे. अगदी आत्तापर्यंत ज्या देशात एकही बॉलिवूडपट रिलीज झाला नाही, अशा देशातही हा चित्रपट रिलीज होणार आहे. होय, जापान हा त्यापैकीच एक देश. भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे तर बॉलिवूड सिनेमे जवळपास ५० देशांत रिलीज होता. यात अमेरिका, आॅस्ट्रेलिया, ब्रिटन, न्यूझीलंड, मलेशिया, सिंगापूर अशा देशांचा समावेश आहे. पण अक्षयचा ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा चित्रपट एकूण ९० देशांत रिलीज होतो आहे.
Web Title: OMG !! Akshay Kumar was given the title 'only' by the international media!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.