OMG !! Aishwarya wants the 'bold roll'! | ​OMG!! स्वत: ऐश्वर्यालाच हवा होता ‘बोल्ड रोल’!

खुद्द ऐश्वर्या राय बच्चन हिलाच ‘ऐ दिल है मुश्किल’मधील बोल्ड भूमिका हवी होती. होय, ऐकता ते खरे आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या बोल्ड अवतारात दिसणार आहे.  ‘सरबजीत’ आणि ‘जज्बा’नंतर ऐशला अशा हॉट अवतारात पाहणे खरे तर अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. पण हा स्वत: ऐशचा निर्णय होता. सूत्रांचे मानाल तर, ‘ऐ दिल है मुश्किल’साठी ऐश्वर्याला विचारणा झाली तेव्हा मेकर्सनी अतिशय सौम्य स्क्रीप्ट (फारशी बोल्ड नसलेली) तिला दिली होती. पण ही स्क्रीप्ट वाचल्यानंतर यात काहीतरी कमतरता असल्याचे ऐश्वर्याला जाणवले. आपल्या भूमिकेत जीवच नाहीयं, असे तिला वाटले. यानंतर ऐश्वर्याने मेकर्सला ही भूमिका अधिक बोल्ड करण्याची गळ घातली. तसे केले तरच ही भूमिका खºया अर्थाने पडद्यावर प्रभावी ठरेल, असे ऐशचे मत होते. यानंतर केवळ ऐश्वर्याच्या आग्रहाखातर ‘ऐ दिल...’मधील तिची भूमिका अधिक बोल्ड करण्यात आली.‘ऐ दिल...’च्या स्क्रिप्टवर अधिक काम केले गेले.  

 
Web Title: OMG !! Aishwarya wants the 'bold roll'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.