OMG: Abhishek can not celebrate Birth Day with family members because of Aishwarya Rai? | OMG : ऐश्वर्या रायमुळे कुटुंबीयांसोबत बर्थ डे सेलिब्रेट करू शकत नाही अभिषेक ?

अभिषेक बच्चन येत्या 5 फेब्रुवारीला आपला 42वा वाढदिवस साजरा करणार आहे. दरवर्षी आपला वाढदिवस अभिषेक संपूर्ण कुटुंबासोबत सेलिब्रेट करतो. मात्र यावर्षी तो असे करु शकणार नाही आहे, यामागचे कारण त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आहे.  

मीडिया रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय आणि अभिषेकची बहिण श्वेता नंदा यांचे फारसे पटत नाही. विराट आणि अनुष्काच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये हे सगळ्यांनीच पाहिले की दोघी एकमेकांनी इग्नोर करत होत्या. त्यामुळे ऐश्वर्या अभिषेकचा बर्थ डे सिडनीमध्ये जाऊन सेलिब्रेट करणार आहे.    

ऐश्वर्या एक इव्हेंट अटेंड करण्यासाठी सिडनीला जाणार आहे. ऐश्वर्याची इच्छा आहे की अभिषेक आणि आराध्याने तिला कंपनी द्यावी आणि अभिषेकचा बर्थ डे ऐशला सिडनीत सेलिब्रेट करायचा आहे. त्यामुळे अभिषेक हा बर्थ डे त्याच्या फॅमिलीसोबत साजरा करु शकणार नाही आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या आणि अभिषेक 2 फेब्रुवारीला सिडनीला पोहोचणार आहे ज्यानंतर तीन दिवस ती तिकडे इव्हेंट अटेंड करणार आहे. 5 फेब्रुवारीला अभिषेकचा वाढदिवस सेलिब्रेट करून 7 फेब्रुवारीला मुंबईला परणार आहेत.  आता या रिपोर्टमध्ये किती तथ्य आहे हे आपल्याला लवकरच कळेल.  

ALSO READ :   पतीच्या ‘या’ एक्स गर्लफ्रेंडसोबत पहिल्यांदाच झाला ऐश्वर्या राय-बच्चनचा आमना-सामना!

लवकरच ऐश्वर्याचा ‘फन्ने खां’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत. ‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. यानंतर ती रात और दिनच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. यात काम करण्यासाठी ऐश्वर्याने 10 कोटींचे मानधन मागितले आहे. या चित्रपटात ऐश्वर्या रायचा डबल रोल असणार आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी विशेष तयारी करावी लागणार आहे. 
Web Title: OMG: Abhishek can not celebrate Birth Day with family members because of Aishwarya Rai?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.