आलिया भटचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या लव लाईफमुळे चर्चेत आला आहे. बऱ्याच कालावधीपासून अशी चर्चा होत आहे की, सिद्धार्थ स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून पदार्पण करणारी तारा सुतारियाला डेट करतो आहे. या वृत्ताला अद्याप सिद्धार्थ किंवा ताराने दुजोरा दिलेला नाही. मात्र आता या कपलला पहिल्यांदाच एकत्र पाहिले आहे.

स्पॉटबॉय डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, तारा व सिद्धार्थ नुकतेच एकत्र दिसले. वरळी येथील एका मॉलमध्ये जाताना त्यांना पाहिले. ते दोघे अमिताभ बच्चन व तापसी पन्नू यांचा बदला चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. 

तारा सुतारियाने टायगर श्रॉफ व अनन्या पांडेसोबत करण जोहरच्या कॉफी विद करण शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये टायगर श्रॉफने इशारा केला होता की तारा स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे.

खरेतर करणने जेव्हा टायगरला रॅपिड फायर राउंडमध्ये विचारले की सिद्धार्थ मल्होत्राकडून तुला काय चोरायचे आहे? त्यावर हसत टायगरने ताराकडे पाहिले होते. टायगरचे हे रिअॅक्शन पाहून करण देखील थकीत झाला होता आणि त्यांनी विचारले होते की हे कधी झाले? त्यावर ताराने लाजत त्या गोष्टीला नकार दिला होता. ताराने सांगितले होते की, तिचे सिद्धार्थ मल्होत्रावर क्रश आहे. या शोच्या अखेरच्या राउंडमध्ये जेव्हा एका सेलेबला कॉल करायचा होता. त्यावेळी ताराने सिद्धार्थला कॉल केला होता.


कॉफी विद करण शोमध्ये करण जोहरने सांगितले होते की, तारा आधी शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरला डेट करत होती. यावर ताराने सांगितले की, मी बालपणापासून ईशानला ओळखते आणि आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. 
आता सिद्धार्थ व तारा त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


Web Title: Oh ...! Siddharth Malhotra falls in love with actress for 11 years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.