अरे बापरे...! चक्क १० कोटींचा 'भारत'चा सेट या कारणामुळे होणार उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 09:08 AM2019-02-14T09:08:47+5:302019-02-14T09:12:16+5:30

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी 'भारत' चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. येत्या काही महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Oh my God! The set of '10 crore' India will be destroyed due to this reason | अरे बापरे...! चक्क १० कोटींचा 'भारत'चा सेट या कारणामुळे होणार उद्ध्वस्त

अरे बापरे...! चक्क १० कोटींचा 'भारत'चा सेट या कारणामुळे होणार उद्ध्वस्त

googlenewsNext
ठळक मुद्दे'भारत'च्या क्लायमॅक्ससाठी तब्बल १० कोटींचा सेट उभारण्यात आलाय फिल्मसिटीत 'भारत' चित्रपट 'ओडे टू माय फादर' या कोरियन चित्रपटावर आधारीत


बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी 'भारत' चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. येत्या काही महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये १० कोटींचा सेट उभारण्यात आला आहे. पण, चित्रपटाच्या क्लायमॅक्ससाठी हा सेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येणार आहे.

'भारत' चित्रपट 'ओडे टू माय फादर' या कोरियन चित्रपटावर आधारीत असून यात कतरिना, सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचे शूटिंग देशातल्या वेगवेगळ्या शहरात करण्यात आले आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच सलमान वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. चित्रीकरणास दिरंगाई होऊ नये म्हणून सलमाननेही आपले बस्तान काही महिन्यांपासून फिल्मसिटी परिसरात हलवले आहे.

'भारत'च्या क्लायमॅक्ससाठी तब्बल १० कोटींचा सेट फिल्मसिटीत उभारण्यात आला आहे. दिल्लीचा हा सेट आहे; मात्र क्लायमॅक्ससाठी तो पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. क्लायमॅक्स चित्रीत करण्यासाठी केवळ सहा दिवस राहिले असून लवकरच चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटाची सलमान व कतरिनाचे चाहते औत्सुकतेने वाट पाहत आहेत. 
 

Web Title: Oh my God! The set of '10 crore' India will be destroyed due to this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.