अरे बापरे...! संजय दत्तने या सिनेमासाठी तब्बल २५ किलो वजनाचे परिधान केले कवच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 08:00 PM2019-03-19T20:00:00+5:302019-03-19T20:00:00+5:30

बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्त लवकरच 'कलंक' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटानंतर तो 'पानिपत' या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.

Oh my God! Sanjay Dutt has been wearing 25 kg weight for the film | अरे बापरे...! संजय दत्तने या सिनेमासाठी तब्बल २५ किलो वजनाचे परिधान केले कवच

अरे बापरे...! संजय दत्तने या सिनेमासाठी तब्बल २५ किलो वजनाचे परिधान केले कवच

googlenewsNext
ठळक मुद्देसंजय दत्त पानिपतमध्ये साकारणार अफगाण किंगची भूमिका


बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्त लवकरच 'कलंक' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटानंतर तो 'पानिपत' या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. या चित्रपटात संजय दत्त अफगाण किंग अहमद शाह दुर्रानीच्या भूमिकेत दिसणार आहे.  

'पानिपत'च्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष करणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी संजय दत्तसाठी स्पेशल कवच डिझाईन केले आहे. या कवचचे वजन २५ किलो आहे. हे कवच परिधान करून शूट करताना अडचण येऊ नये यासाठी संजय दत्तला खूप तयारी करावी लागली. डिएनएच्या रिपोर्टनुसार, पानिपत चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जयपूरमध्ये सुरू आहे.


संजय दत्तला अफगाण किंगच्या भूमिकेसाठी पंचवीस किलो वजन असणारे कवच परिधान करावे लागते. ते कवच घालण्यापूर्वी संजय दत्त जिममध्ये एक्सरसाइज करतो. इतकेच नाही तर त्याने या भूमिकेसाठी मुंबईतून व्यायामासाठी इक्विपमेंट मागवले आहेत. त्याने चित्रीकरणाच्या जागीच त्याने जिम तयार केली आहे. 


संजय दत्तने यावर्षी पाच पेक्षा जास्त चित्रपट साईन केले आहे. त्यासाठी तो स्ट्रीकली डाएट व वर्कआऊट करतो आहे. या चित्रपटांमध्ये तो वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत चित्रपटात संजय दत्त व्यतिरिक्त अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन, पद्मिनी कोल्हापुरे व मोहनीश बहल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Oh my God! Sanjay Dutt has been wearing 25 kg weight for the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.