अरे बापरे...! अवॉर्ड शोदरम्यान अक्षय कुमारच्या छातीतून येऊ लागलं रक्त, त्याची अवस्था पाहून घाबरली ट्विंकल खन्ना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:51 PM2019-04-02T15:51:20+5:302019-04-02T15:52:42+5:30

अवॉर्ड शो दरम्यान बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या छातीतून अचानक रक्त येऊ लागले. यावेळी तिथे अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना व सासू डिंपल कपाडिया उपस्थित होते.

Oh my God! Akshay Kumar's blood thrown out of the show during the show, Twinkle Khanna feared to see his condition | अरे बापरे...! अवॉर्ड शोदरम्यान अक्षय कुमारच्या छातीतून येऊ लागलं रक्त, त्याची अवस्था पाहून घाबरली ट्विंकल खन्ना

अरे बापरे...! अवॉर्ड शोदरम्यान अक्षय कुमारच्या छातीतून येऊ लागलं रक्त, त्याची अवस्था पाहून घाबरली ट्विंकल खन्ना

googlenewsNext

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार सध्या केसरी चित्रपटामुळे चर्चेत आहे. होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला केसरी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १२५ कोटींहून जास्त कमाई केली आहे. मात्र एका घटनेमुळे अक्षय कुमार चर्चेत आला आहे.

अक्षय कुमार एका अवॉर्ड शोमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने पांढऱ्या रंगाच्या शर्टवर ब्लेझर परिधान केला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि त्याची सासू डिंपल कपाडिया उपस्थित होती. अक्षय कुमार स्टेजवर गेला तेव्हा त्याच्या छातीतून अचानक रक्त येऊ लागले. त्याला खूप दुखत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून जाणवले. हे पाहून ट्विंकल खन्ना व डिंपल कपाडिया घाबरले. ट्विंकल खन्ना व डिंपल कपाडियाला टेन्शनमध्ये पाहून अक्षय कुमारने परिस्थितीला सांभाळून घेतले आणि तो अचानक हसू लागला. अक्षयने सांगितले की, आज एप्रिल फुल डे आहे आणि सगळ्यांना एप्रिल फुल बनवले. हे समजल्यावर डिंपल व ट्विंकलच्या जीवात जीव आला.


अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे तर अक्षय कुमार केसरी चित्रपटानंतर मिशन मंगल चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा व शर्मन जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Oh my God! Akshay Kumar's blood thrown out of the show during the show, Twinkle Khanna feared to see his condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.