Now instead of Chitrangda, 'this' will act as romance Nawazuddin Romance | ​चित्रांग्दाऐवजी आता ‘ही’ अ‍ॅक्ट्रेस करणार नवाजुद्दीनशी रोमॅन्स

काही दिवसांपूर्वीच चित्रांग्दा सिंगने ‘बाबुमोशाय बंदुकबाज’ या चित्रपटातून कामूक सीन्समुळे माघार घेतली होती.

कथेची गरज नसतानाही निर्माते नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत इंटिमेट सीन करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत होते असे तिने आरोप केला होता. निर्मात्यांनीही तिच्या प्रत्यारोप करत ती खोटं बोलतेय असे म्हटले.

हा वाद मागे टाकून आता निर्मात्यांनी चित्रांग्दाऐवजी रिचा चढ्ढाला सिनेमात कास्ट केले आहे. रिचा आणि नवाजने यापूर्वी ‘गॅग्स आॅफ वासेपूर’ चित्रपटात केलेले आहे.

दिग्दर्शक कुशन नंदी म्हणला की, रिचा फार चांगली अभिनेत्री आहे. तिने चित्रपटात काम करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. झालेल्या वादाचा चित्रपटाच्या शुटिंगवर काहीही परिणाम झाला नसुन लखनऊ येथे सुरूळीत चालू आहे.

विशेष म्हणजे ‘बाबुमोशाय बंदुकबाज’ सिनेमासंदर्भात यापूर्वी कलाकार व तंत्रज्ञांचे पैसे न देण्यावरूनही वाद झाले आहेत.

Web Title: Now instead of Chitrangda, 'this' will act as romance Nawazuddin Romance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.