टायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानी दिसली या राजकीय नेत्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:03 PM2019-03-11T18:03:40+5:302019-03-11T18:07:41+5:30

टायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानीला नुकतेच मुंबईत एका राजकीय नेत्यासोबत दिसली.

Not Tiger Shroff, Disha Patani spotted with shivsena yuvasena chief aditya thackeray | टायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानी दिसली या राजकीय नेत्यासोबत

टायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानी दिसली या राजकीय नेत्यासोबत

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत तिला एका हॉटेलच्या बाहेर पाहाण्यात आलं. दिशा आणि आदित्य यांना एकत्र पाहाताच त्यांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशा पटानीने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्याआधी 'लोफर' या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती. धोनी या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली आणि त्यानंतर जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं. 'बागी-२' या सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली होती. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना प्रचंड भावली होती. 

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे ऐकायला मिळत आहे. दिशा आणि टायगर अनेक वेळा एकत्र पाहायला मिळतात. ते कधी लंच टेडवर जातात तर कधी पार्टींमध्ये एकत्र दिसतात. दिशा आणि टायगरमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याचे नेहमीच म्हटले जाते. सोशल मीडियावरदेखील नेहमीच त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असतात. पण दिशाने नेहमीच त्यांच्या नात्याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान टायगरने  त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, सेलिब्रेटींच्या आयुष्याची चर्चा नेहमीच सगळीकडे सुरू असते. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची इच्छा सगळ्यांना असते हे मला माहिती आहे. त्यामुळे दिशा आणि माझ्याकडे लोकांचे जास्तच लक्ष असते. आम्ही दोघे एकत्र खूप धमाल मस्ती करतो आणि एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. त्यामुळे या सगळ्या चर्चेचा आमच्या मैत्रीवर कधीही फरक पडत नाही.   

टायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानीला नुकतेच मुंबईत एका राजकीय नेत्यासोबत दिसली. शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत तिला एका हॉटेलच्या बाहेर पाहाण्यात आलं. दिशा आणि आदित्य यांना एकत्र पाहाताच त्यांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

दिशा प्रेक्षकांना लवकरच भारत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात दिशा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

Web Title: Not Tiger Shroff, Disha Patani spotted with shivsena yuvasena chief aditya thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.