शाहरुख-रणबीरचा हा जुना फोटो एका वेगळ्या कारणाने होतोय व्हायरल , पाहून तुम्हालाही येईल हसू!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 02:01 PM2019-06-07T14:01:41+5:302019-06-07T14:02:23+5:30

तूर्तास शाहरुख व रणबीरचा एक जुना फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या फोटोवरून युजर्स या दोन्ही स्टार्सची चांगलीच मजा घेत आहेत

Not Shah Rukh Khan or Ranbir Kapoor, this pic of these stars is going viral because of a stray dog |  शाहरुख-रणबीरचा हा जुना फोटो एका वेगळ्या कारणाने होतोय व्हायरल , पाहून तुम्हालाही येईल हसू!

 शाहरुख-रणबीरचा हा जुना फोटो एका वेगळ्या कारणाने होतोय व्हायरल , पाहून तुम्हालाही येईल हसू!

googlenewsNext
ठळक मुद्देरणबीर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. शाहरूखने मात्र अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही.

शाहरुख खानरणबीर कपूर हे बॉलिवूडचे सर्वाधिक स्टाइलिश स्टार्स मानले जातात. तूर्तास शाहरुख व रणबीरचा एक जुना फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या फोटोवरून युजर्स या दोन्ही स्टार्सची चांगलीच मजा घेत आहेत. हा फोटो शाहरूख वा रणबीर यांच्यामुळे नाही तर एका वेगळ्या कारणाने व्हायरल होतोय. ते कारण काय, तर फोटोतील कुत्रा.

(साभार)

होय, या जुन्या फोटोत शाहरुख प्रिंटेड कार्गो पँट व ब्लॅक स्वेटशर्टमध्ये दिसतोय. ब्लॅक एविएटर सनग्लासेससोबत तो कमालीचा स्टाइलिश दिसतोय. रणबीर वाइन कलरचा टी-शर्ट आणि ब्ल्यू रग्ड जीन्समध्ये आहे. तोही कूल दिसतोय. पण या दोन स्टाइलिश स्टार्सच्या मागे एक बेवारस कुत्रा उभा असलेला दिसतोय. नेमक्या याच कारणाने युजर्सनी या फोटोवरून शाहरूख व रणबीरची मजा घेतली आहे.

(साभार)

फ्रेममध्ये कुत्रा चुकून आला. पण लोकांची नजर सर्वात आधी त्या कुत्र्यावर गेली. आम्ही रणबीर व शाहरूखला पाहिलेच नाही, आम्हाला तर कुत्रा दिसला, असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने, वाह, काय सुंदर कुत्रा आहे, अशी प्रतिक्रिया दिली. 
रणबीर व शाहरुखच्या कामाबद्दल सांगायचे तर रणबीर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो गर्लफ्रेन्ड आलिया भटसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ‘शमशेरा’ हा रणबीरचा चित्रपटही येत्या काळात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. शाहरूखने अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. मात्र त्याने राजकुमार हिरानींचा चित्रपट साईन केल्याची चर्चा आहे. हॅरी मेट सेजल, झीरो असे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरूखला एका हिटची प्रतीक्षा आहे.

Web Title: Not Shah Rukh Khan or Ranbir Kapoor, this pic of these stars is going viral because of a stray dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.