कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आहे. हा कुठला लहान-मोठा वाद नाही तर एक दीर्घ रिलेशनशिप, त्यानंतरचे तीव्र मतभेद आणि त्यापश्चात सुमारे वर्षभर चाललेली कायदेशीर लढाई होती. अर्थात हृतिकसोबतचा वाद कंगनाचा पहिला वाद नव्हता. इंडस्ट्रीत असे अनेक लोक आहेत, ज्यांच्यासोबतच्या कंगनाच्या वादांचे किस्से आल्या दिवशी ऐकायला मिळतात.

हृतिक रोशनहृतिक रोशनसोबतचा वाद ताजा आहे, त्यामुळे याच नावाने सुरु करूयात. ‘क्रिश’ या चित्रपटाच्या सेटवर हृतिक व माझे अफेअर होते, असा दावा कंगनाने केला होता. पण या अफेअरची चर्चा होण्यापेक्षा या दोघांच्या वादाचीच चर्चा झाली. २८ जानेवारी २०१६ मध्ये एका मुलाखतीत कंगनाने हृतिकचा उल्लेख ‘सिली एक्स’ असा केला आणि यानंतर दोघांचेही प्रायव्हेट अफेअर चव्हाट्यावर आले होते. हृतिकने कंगनाला अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली होती. कंगनानेही या नोटीसला उत्तर देत हृतिकला २१ पानांची नोटीस बजावली होती. यानंतर दोघेही एकमेकांवर बेछूट आरोप करत सुटले होते. कंगनाने मला १४३९ ईमेल पाठवले होते. यापैकी बºयाच ईमेलकडे मी दुर्लक्ष केले. हे सर्व ईमेल व्यक्तिगत, अभद्र भाषेत लिहिलेले होते. . कंगना ही aspergers Sydromeने ग्रासलेली आहे. यामुळे ती कल्पनेत जगते. कल्पना रंगवते, असा आरोप हृतिकने केला होता. कंगनानेही हृतिकवर आरोप ठेवले होते. हृतिकनेच माझ्याशी बोलण्यासाठी खास ईमेल आयडी तयार केला होता. हृतिक  व सुजानचे नाते, त्यांच्यातील घटस्फोट याबाबत हृतिकने अनेकदा माझ्याशी वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या, असे कंगना म्हणाली होती. प्रकरणानंतर हृतिकने माझी माफी मागायला हवी. तो माफी मागत नाही, तोपर्यंत मी या प्रकरणावर बोलणार, असे कंगना म्हणाली आहे.

करण जोहरहृतिकप्रमाणेच करण जोहरसोबतचा कंगनाचा वादही बराच गाजला होता. काही महिन्यांपूर्वी कंगना करणच्या ‘कॉफी विद करण’मध्ये गेली होती आणि करणच्याच शोमध्ये करणलाच नाही, नाही ते बोलून आली होती. करणला ‘फिल्मी माफिया’ म्हणण्यास तिने मागेपुढे पाहिले नव्हते. बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रहार करताना कंगनाने करणला लक्ष्य केले होते. कंगनाचा हा वार करणच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.  यानंतर कंगनाच्या या टीकेला करणनेही तिच्याच शब्दात उत्तर दिले होते. जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेव्हा तुम्ही स्वत:ला एखाद्या पीडित व्यक्तीसारखे सादर करू शकत नाही.जणू काही बॉलिवूडमध्ये तुमच्यावर प्रचंड अत्याचार होत आहेत. बॉलिवूड इतके वाईट असेल तर सोडून द्यावे, असे  म्हणाला होता. त्याचा इशारा अर्थातच कंगनाकडे होता.

प्रभास२००८ मध्ये कंगनाचा ‘फॅशन’ हा सिनेमा हिट झाल्यानंतर तिचा एक तेलगू चित्रपट रिलीज झाला होता. ‘एक निरंजन’ असे या चित्रपटाचे नाव होते. यात कंगनाचा हिरो होता, ‘बाहुबली’ प्रभास. अर्थात त्यावेळी ना कंगना ‘क्वीन’ होती, ना प्रभास ‘बाहुबली’ होता. अलीकडे कंगनाने या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा शेअर केला होता. या चित्रपटाच्या सेटवर प्रभास अन् माझे इतके मोठे भांडण झाले होते की, आम्ही एकमेकांशी बोलणे सोडून दिले होते, असे तिने सांगितले होते.

शाहिद कपूरशाहिद व कंगना हे दोघे ‘रंगून’मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कंगनाने शाहिदला डिवचले होते. सेटवर शाहिदचे मूड नेहमीच खराब असायचे. तो मला सुसाईड बॉम्बरसारखा वागवायचा, असे कंगना म्हणाली होती. यानंतर शाहिदनेही कंगनाला तिच्याच शब्दांत उत्तर दिले होते. मला कंगनाच्या बोलण्याने फरक पडत नाही. प्रत्येकाशी वाद उखरून काढणाºया कंगनाची एखाद्या को-स्टारशी तरी मैत्री व्हावी, अशी मी प्रार्थना करतो, असे तो म्हणाला होता.

अजय देवगण२०११ मध्ये आलेल्या ‘रास्कल’च्या शूटींगदरम्यान कंगनाचे अजय देवगण व संजय दत्तशी वाजल्याची खबर आली होती. कंगना स्वत:ला सुपरस्टारचा तोरा दाखवू लागली आहे, असे संजय म्हणाला होता. त्याकाळात अजय देवगण व कंगनाच्या अफेअरच्याही बातम्या होत्या. पण एका मुलाखतीत कंगना अजयबद्दल असे काही बोलली की, अजयच नाही तर संजय दत्तही नाराज झाला होता. यानंतर त्यांनी कंगनाला चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चलाही बोलवले नव्हते.

अध्ययन सुमनALSO READ :   ​विवाहित-अविवाहित, तरूण-म्हातारे सगळ्यांनीच चान्स मारू बघितला ! कंगना राणौत पुन्हा बोलली!!

शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन आणि कंगना एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये हृतिक व कंगनाचा वाद चर्चेत असताना अध्ययनने कंगनावर विचित्र आरोप केले होते. कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ती आल्यादिवशी मला मारहाण करायची. घाणेरड्या शिव्या द्यायची. काळी जादू करायची. रक्त पाजायची, असे आरोप त्याने केले होते.

आनंद एल रायकंगनाच्या आयुष्यातील सगळ्यांत यशस्वी चित्रपट ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’चे दिग्दर्शक आनंद एल राय यांच्यासोबत कंगनाचा वाद आहे. सूत्रांच्या मते, आनंद माझ्यासाठी एक चित्रपट लिहित असल्याचे कंगनाने यावर्षी एका मुलाखतीत सांगितले होते. पण आनंद यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, याचा इन्कार केला होता. सूत्रांच्या मते, आनंद यांच्या या नाराजीचे कारण कंगना व करण जोहरचा वाद होता.

अपूर्व असरानीकंगनाचा ‘सिमरन’हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आहे.  मध्यंतरी हा चित्रपट चर्चेत आला होता ते, कंगना व अपूर्व असरानी यांच्यातील मतभेदांमुळे. आता हा अपूर्व असरानी कोण? तर  ‘सिमरन’चा पटकथालेखक. या चित्रपटाची कथा अपूर्वने लिहिली आहे. पण अचानक चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय कंगनाला विभागून दिले गेले. पटकथेचे सगळे श्रेय कंगना लाटत असलेली पाहून अपूर्व भलताच संतापला होता. 
Web Title: Not only Hrithik Roshan but also with many of these Kangana Ranaut's fight!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.