Is not Aamir any film next year? | ​पुढीलवर्षी आमीरचा एकही चित्रपट नाही?

आमीर खान एका वर्षात केवळ एकच चित्रपट करतो. याच कारणामुळे पुढील वर्षी आमीरचा लीड रोल असलेला कुठलाही चित्रपट प्रदर्शित होणार नाहीय. आमीर पुढील वर्षी ‘सीक्रेट सुपरस्टार’मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. ‘दंगल’नंतर आमीरने केवळ ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ साईन केली आहे. हा चित्रपट २०१८ च्या दिवाळीत प्रदर्शित होईल. त्यामुळे पुढील वर्षी आमीरचा एकही चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार नाही. सध्या आमीर ‘दंगल’मध्ये व्यस्त आहे. यात तो एका पहेलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

Web Title: Is not Aamir any film next year?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.