'भारत'मध्ये नोरा फतेहीचे आयटम नंबर नाही तर आहे सिच्युएशनल साँग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 02:15 PM2019-05-23T14:15:08+5:302019-05-23T14:16:12+5:30

बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही लवकरच 'भारत' चित्रपटात झळकणार आहे.

No Item Number For Nora Fatehi In Bharat, But The Dancing Diva Is Sure To Make An Impact | 'भारत'मध्ये नोरा फतेहीचे आयटम नंबर नाही तर आहे सिच्युएशनल साँग

'भारत'मध्ये नोरा फतेहीचे आयटम नंबर नाही तर आहे सिच्युएशनल साँग

googlenewsNext

'दिलबर दिलबर...' म्हणत आपल्या तालावर थिरकायला लावणारी बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही लवकरच 'भारत' चित्रपटात झळकणार आहे. पण, यावेळेस ती या चित्रपटात कोणतेही आयटम नंबर नाही तर सिच्युएशनल साँगवर थिरकताना दिसणार आहे. तिचे या चित्रपटातील सलमान खानसोबतचे एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बोल आहेत 'तुर पेया'. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

'तुर पेया' या गाण्यात सलमान खानसोबतनोरा फतेही पहायला मिळते आहे. या गाण्यातील सलमानसोबतच नोराच्या डान्सची देखील सगळीकडे खूप चर्चा होत आहे. 'भारत'मधील भूमिका व गाण्यांबद्दल नोराने सांगितले की, 'तुर पेया' हे आयटम साँग नसून सिच्युएशनल गाणे आहे. तसेच या चित्रपटात माझी छोटीशी भूमिका आहे. पण, प्रेक्षकांना या चित्रपटातील माझा अभिनय लक्षात राहिल. सलमान खानच्या चित्रपटाचा भाग असणे ही सिनेइंडस्ट्रीमध्ये खूप मोठी बाब आहे.


नोरा फतेहीला आयटम नंबरसाठी ओळखले जाते, तिला ही प्रेक्षकांमधील इमेज बदलायची असून याबद्दल ती म्हणते की, एक प्रोजेक्ट इमेज बदलू शकत नाही. माझ्याकडे यावर्षी काही प्रोजेक्ट आहेत ज्यात मी रसिकांना डान्स व म्युझिकपेक्षा वेगळे काहीतरी करताना दिसणार आहे.


'भारत' चित्रपटात सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच नोराही  महत्वाच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  


नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती 'भारत' व्यतिरिक्त 'बाटला हाऊस', 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Web Title: No Item Number For Nora Fatehi In Bharat, But The Dancing Diva Is Sure To Make An Impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.