No celebrity, no big deal ... Bollywood actress has done her hometown in her father's hometown | ना कुणी सेलिब्रिटी, ना कोणता बडेजावपणा.... बॉलिवूडच्या या अभिनेत्यानं वडिलोपार्जित गावात केलं आपल्या लेकीचं लग्न

बॉलिवूडमध्ये थोडं यश मिळालं की कलाकार हुरळून जातात. आपण काही तरी खूप मोठं केलं आहे, स्टार झालो आहोत अशी भावना त्यांच्यात वाढू लागते. अवघ्या काही दिवसांत स्टारडम आल्यानं आपल्यापुढे इतर व्यक्ती कुणीच नाही असं त्यांना वाटू लागते. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत आजही असे काही मोजके कलाकार आहेत जे बरंच यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी त्यांची नाळ आजही घट्ट जोडली गेलेली आहे. कोणताही बडेजावपणा न करता ते आजही आपल्या माणसांसह मिळून मिसळून वागतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील अशाच मोजक्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता आणि कॉमेडीयन राजपाल यादव. नुकतंच राजपालनं त्याच्या लेकीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. मात्र या लग्नसोहळ्यात कोणताही थाटमाट, बडेजावपणा बिल्कुल नव्हता. उत्तर प्रदेशमधील शाहजांहपूर इथल्या कुंडरा या वडिलोपार्जित गावात राजपालची लेक ज्योतीचा विवाहसोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला कुणीही बॉलीवुडचे सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. आग्रा इथल्या एका बँकेत कॅशिअरची नोकरी करणा-या मुलासह राजपालची लेक ज्योती रेशीमगाठीत अडकली. ज्योती ही राजपालची पहिली पत्नी करुणा हिची लेक आहे. ज्योतीच्या जन्मावेळीच तिच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हापासून जवळपास 15 वर्षे ज्योती कुंडरा या गावातच राहत होती. गेल्या 5 वर्षांपासून ती वडिल राजपालसह मुंबईत राहत होती. राजपालने 10 जून 2003 रोजी दुसरे लग्न केलं. राधा ही राजपालची दुसरी पत्नी आहे. हिरो सिनेमाच्या शुटिंगसाठी राजपाल कॅनडाला गेला होता. त्यावेळी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून राजपाल आणि राधाची भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघांचं ट्युनिंग चांगलं जमलं. दोघांच्या उंचीत दोन इंचाचा फरक आहे. असं असूनही त्यांच्यात घट्ट बॉन्डिंग तयार झालं. राधा मुंबईत पहिल्यांदा आली तेव्हा राजपालनं तिला खास सरप्राईज दिलं होतं. तिला इंम्प्रेस करण्यासाठी राजपालनं खास तयारी केली होती. त्याने घराचं इंटिरिअर खास पद्धतीने तयार केले होते. कॅनडातील ज्या हॉटेलमध्ये दोघांची पहिली भेट झाली त्या रुमप्रमाणे राजपालने आपल्या घराचे इंटिरिअर केले होते. राजपाल आणि राधा यांच्या आयुष्यात हनी नावाची एक छोटी लेक आहे.

Also Read:राजपाल यादवपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे त्याची पत्नी, हाइट बघाल तर दंग व्हाल!

अभिनेता राजपाल यादव लवकरच आगामी ‘जुडवा-२’मध्ये बघावयास मिळणार आहे. कॉमिक अंदाजासाठी ओळखल्या जाणाºया राजपालच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९९९ मध्ये आलेल्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून झाली. चित्रपटात मोठी भूमिका न मिळताही त्याने छोट्या-छोट्या भूमिका साकारून स्वत:ची ओळख निर्माण केली. शिवाय बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान बळकट बनविले. राजपालच्या पर्सनल लाइफविषयी सांगायचे झाल्यास त्याची फॅमिली लाइमलाइटपासून दूर आहे. त्यामुळेच त्याच्या पर्सनल लाइफविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला त्याच्या पर्सनल लाइफविषयी सांगणार आहोत. राजपालची पत्नी राधा त्याच्यापेक्षा जवळपास नऊ वर्षांनी लहान आहे. याबाबतचा खुलासा स्वत: राजपालनेच एका मुलाखतीदरम्यान केला होता. ५.२ फूट एवढी उंची असलेल्या राजपालचे राधाबरोबर लव्ह मॅरेज झाले आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘लोकांना असे वाटते की, ती माझ्यापेक्षा खूपच उंच आहे. परंतु वास्तविकता ही आहे की, ती माझ्यापेक्षा केवळ एका इंचाने मोठी आहे. म्हणजेच माझी उंची ५.२ फूट तर तिची उंची ५.३ इंच असल्याचे त्याने सांगितले. 
Web Title: No celebrity, no big deal ... Bollywood actress has done her hometown in her father's hometown
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.