No, Bhaji Sadi, no Bhangre Kunku ... !! All the lucky draws removed? | ​ना भरजरी साडी, ना भांगेत कुंकू...!! रेखाने का काढून फेकले सर्व सौभाग्यलंकार?

सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम असलेल्या रेखाला श्रृृंगाराशिवाय पाहणे कुणालाही जीवावर येईल. याचे कारणही तसेच आहे. भरजरी सिल्डची साडी, त्यावर मॅचिंग दागिणे, कपाळावर मोठी टिकली,भांगेत लालचुटूक कुंकू ही रेखाची स्टाईल आहे. त्याशिवाय रेखाची कल्पनाच करता येणार नाही. गेल्या अनेक  वर्षांपासून रिअल लाईफमध्ये लोक याचरूपात रेखाला बघत आले आहेत. पडद्यावर ती कशीही दिसो, रिअल लाईफमध्ये मात्र रेखा याच रूपात दिसली. सिल्कची साडी आणि भरलेली भांग हे जणू रेखाचे स्टाईल स्टेटमेंट झाले आहे. पण अचानक अलीकडे रेखाचा हा चिरपरिचित अंदाज ‘मिस’ दिसला आणि सगळ्यांनाच चुकल्यासारखे झाले. दुस-याच क्षणाला याची बातमी झाली नसेल तर नवल.रेखा काल-परवा एका पार्टीत पोहोचली पण तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण रेखाच्या अंगावरचे सगळे सौभाग्यलंकार गायब होते. ना भरजरी साडी, ना हातात बांगड्या, ना भांगेत कुंकू, ना कपाळावर टीकली... रेखाने सिल्व्हर रंगाची साडी नेसली होती. त्यावर मॅचिंग नेक पीस आणि डोळ्यावर काळा गॉगल असे तिचे रूप होते.गेल्या अनेक वर्षांत रेखाला सौभाग्यलंकाराशिवाय बघितले गेले नव्हते. पण काल-परवाच्या पार्टीत अचानक ती याशिवाय दिसली आणि सगळेच अवाक् झालेत. मग तिच्या या नव्या लूकला धरून वेगवेगळ्या चर्चा व तर्क - वितर्कांना ऊत आला.

ALSO READ : अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे’वर रेखाने लावले ठुुमके...पाहा फोटो!!

रेखाचे पती मुकेश अग्रवाल यांचा मृत्यू झालेला आहे. याऊपरही रेखा कुणाच्या नावाचे कुंकू लावते, हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांत अनुत्तरीत आहे. बहुतेकदा  अमिताभ बच्चन यांच्याशी त्याचा संबंध जोडला जातो. मध्यंतरी रेखा अभिनेता संजय दत्त याच्या नावाचे कुंकू लावते, अशीही चर्चा होती. यासिर उस्मान यांच्या पुस्तकात हा खुलासा करण्यात आला आहे. निश्चितपणे या खुलाशाने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. फी‘ँ: ळँी वल्ल३ङ्म’ िर३ङ्म१८नुसार, रेखा आणि संजय दत्त यांचं गुप्त पद्धतीने लग्न झालं होतं.  १९८४ मध्ये आलेल्या ‘जमीन आसमान’ या सिनेमाच्या शूटींगवेळी रेखा आणि संजय दत्त हे जवळ आले होते. 
Web Title: No, Bhaji Sadi, no Bhangre Kunku ... !! All the lucky draws removed?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.