Nitu Kapoor apologized after a fight between Sohail's wife and Rishi Kapoor! | सोहेलची पत्नी अन् ऋषी कपूर यांच्यातील भांडणानंतर नितू कपूरने मागितली माफी!

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत पत्नी नीतू कपूरसोबत पोहोचलेले ऋषी कपूर यांचे सलमानचा भाऊ सोहेल खानची पत्नी सीमा खानसोबत भांडण झाले होते. रिपोर्ट्सनुसार, या संपूर्ण प्रकरणानंतर आता नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांची चूक मान्य करीत सोहेल खानची माफी मागितली आहे. या घटनेनंतर खान फॅमिली प्रचंड नाराज झाली होती. हा वाद आणखी चिघळू नये म्हणून नीतू कपूर यांनी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

ALSO READ : सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ऋषी कपूर अन् सोहेल खानच्या पत्नीचे झाले भांडण!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यामुळे संतापले होते की, पार्टीत सलमान त्यांच्याशी व्यवस्थित बोलला नव्हता तसेच व्यवस्थित वागलाही नव्हता. पार्टीत सलमान दुसºया लोकांसोबत सिंगिंग आणि डान्सिंगमध्ये व्यस्त होता. त्याचबरोबर शाहरूख आणि अन्य लोकांबरोबर तो पार्टी एन्जॉय करीत होता. त्यानंतर ऋषी कपूर यांनी याविषयी सोहेलची पत्नी सीमा खानसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर सीमाने ऋषी आणि तिच्या झालेल्या वादाविषयी सलमानला सांगितले. ज्यामुळे सलमान चांगलाच अपसेट झाला होता. काही वेळानंतर ही बाब संपूर्ण खान परिवारात पसरली. वाद आणखी वाढू नये याचा विचार करून नीतू कपूरने लगेचच सोहेलची माफी मागितली. तसेच पती ऋषी यांची चूकही तिने मान्य केली. दरम्यान, गेल्या ८ मे रोजी सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्नाच्या बंधनात अडकली. दिवसा लग्नसोहळा पार पडल्यानंतर त्याच रात्री ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शन पार्टीत सलमान, शाहरूख, जॅकलिनसह अनेक कलाकार मस्तीच्या मूडमध्ये दिसले. 
Web Title: Nitu Kapoor apologized after a fight between Sohail's wife and Rishi Kapoor!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.