Nia Sharma takes on the song 'This' song, video is viral! | निया शर्माने डीजे स्नेकच्या ‘या’ गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ होतोय व्हायरल !

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा भलेही सध्या छोट्या पडद्यापासून दूर असली तरी, ती तिच्या ‘Twisted 2’ या वेबसीरीजमुळे सध्या भलतीच चर्चेत आहे. ‘खतरों के खिलाडी’मध्ये जबरदस्त स्टंट केल्यामुळे आणि ‘जमाई राजा’मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. त्याचबरोबर निया सोशल मीडियावरही जबरदस्त लोकप्रिय आहे. नुकताच तिने तिच्या सोशल अकाउंटवर डान्सचा एक रिहर्सल व्हिडीओ पोस्ट केला, जो सध्या वाºयासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये निया डीजे स्नेकच्या ‘Magenta Riddim’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 

नियाने तिचा हा व्हिडीओ १४ तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यास आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिकवेळा बघण्यात आले आहे. नियाच्या चाहत्यांकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. या व्हिडीओला चाहत्यांकडून ‘रॉकस्टार, नाइज डान्स’ अशाप्रकारच्या कॉमेण्ट्स दिल्या जात आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नियाने गोल्ड अवॉर्ड्स २०१८चा हॅशटॅग पोस्ट केला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, ती गोल्ड अवॉर्ड्समध्ये परफॉर्मन्स करण्याची तयारी करीत आहे. 
 

निया शर्मा छोट्या पडद्यावरूनच मोठी स्टार बनली आहे. तिने आशियातील तिसरी मोस्ट सेक्सी वुमनचा किताबही आपल्या नावे केला आहे. तिच्या ‘ट्विस्टेड’ या वेबसीरीजचा दुसरा सीजनही हिट ठरला. दरम्यान, नियाने तिच्या करिअरची सुरुवात ‘काली’ या मालिकेतून केली होती. तिला खरी ओळख ‘एक हजारों में मेरी बहना है’ आणि ‘जमाई राजा’ या मालिकांमुळे मिळाली. या व्यतिरिक्त ती ‘खतरों के खिलाडी’च्या सीजन-८ मध्येही बघावयास मिळाली आहे. 
Web Title: Nia Sharma takes on the song 'This' song, video is viral!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.