मौनी राय आणि मोहित रैना या दोघांच्या ब्रेकअपची बातमी आपण काही दिवसांपूर्वी वाचली होती. महिनाभरापूर्वी या ब्रेकअपच्या बातमीने मौनीच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण आता चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. होय, मौनी व मोहितमध्ये बिनसल्याची बातमी असताना निर्माता सोहाना सिन्हाच्या दिवाळी पार्टीचे फोटो मात्र वेगळीच कथा सांगत आहेत.होय, सोशल मीडियावर मौनी तिच्या मित्रांसोबत दिवाळी साजरी करताना दिसतेय. या फोटोंमध्ये मोहित रैनाहीआहे. मौनीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही मोहितसोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे.मोहित यात काहीसा बदललेला दिसतोय. त्याची दाढी वाढलेली आहे. पण अर्थातच मौनी व मोहितची ‘लव्ह केमिस्ट्री’ मात्र जराही बदललेली नाही.‘देवो का देव महादेव’ या लोकप्रीय मालिकेच्या सेटवर मौनी व मोहित यांचे प्रेम बहरले होते. तेव्हापासून दोघेही सोबत होते. पण अलीकडे या लव्हबर्ड्सचे मार्ग बदलल्याचे ऐकीवात आले होते. अर्थात मौनी किंवा मोहित यापैकी दोघांनीही ही न्यूज कन्फर्म केली नव्हती. पण सोशल मीडियावर दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्याने या चर्चेला जोर चढला होता.मौनी व मोहित दोघेही सोशल मीडियावर चांगलेच अ‍ॅक्टिव्ह आहेत.  दोघेही एकमेकांसोबतचे फन अ‍ॅण्ड लव्ह मोमेंट शेअर सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण मध्यंतरी दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केले म्हटल्यावर सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या होत्या. मोहितसोबतचे अनेक फोटोही मौनीने आपल्या अकाऊंटवरून डिलिट केल्याचे म्हटले गेले होते. पण कदाचित हा सगळा दुरावा मिटला असे दिसतेय. असे नसते तर मौनी व मोहित एकत्र दिसले नसते. दिवाळीच्या प्रकाशात या दोघांच्या नात्यातील काही काळे कुट्ट क्षण दूर झालेत, असेच समजायला हवे.

ALSO READ: video : ​मौनी रायच्या या डान्स व्हिडिओवर तुम्हीही व्हाल ‘फिदा’!

यापूवीर्ही मोहित व मौनीच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चेत होत्या. अर्थात त्यावेळी मोहितने या बातम्यांचा इन्कार केला होता. धीस इज आॅल रबीश, असे तो म्हणाला होता. तिला तिच्या कामावर फोकस करू द्या. ती प्रचंड मेहनत घेतेय. आपल्या कामासाठी रात्रीचा दिवस करतेय. तिच्या यशाचे कौतुक करायचे सोडून काही लोक तिला खाली खेचू पाहत आहेत, असे मोहित म्हणाला होता. मौनी लवकरच अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ या चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: The news of Mauni Rai's breakup became false, celebrated Diwali celebrations with Boyfriend!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.