New poster out of Akshay Kumar's 'Gold' film, release date confirmed | अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाचे नवे पोस्टर आऊट, रिलीजची तारीख झाली कन्फर्म

सध्या अक्षयचे स्टार जोरावर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अक्षयकडे सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये चांगलाच व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये अक्षयच्या 'गोल्ड' चित्रपट सतत चर्चे आहे. चित्रपटाची एडिटिंग पूर्ण न झाल्याने निर्मात्यांनी रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र आता या सगळ्यावर अफवांवर  अक्षय कुमारने पूर्ण विराम लावला आहे. काही वेळापूर्वीच अक्षयने गोल्डचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. ज्या पोस्टरमध्ये चित्रपटाची तारीख 15 ऑगस्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आलीयं.     


 

पहिल्यांदाच यात संपूर्ण हॉकी टीम दाखवण्यात आली आहे. याआधी जे पोस्टर रिलीज झाले होते यात फक्त अक्षय कुमार दिसला होता.  हा चित्रपट देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. भारताना 1948 साली हॉकीमध्ये गोल्ड जिंकले होते. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये सुरू झाली आहे. चित्रपटाच्या सेटवरचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे. छोट्या पडद्यावरील नागीण फेम मौनी रॉय हि याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. 

ALSO READ :  करिना कपूरबद्दल विचारताच जाम वैतागला अक्षय कुमार!!

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार या चित्रपटातील एका गाण्याचे शूट करताना देसी लूकमध्ये दिसला होता. अक्षय कुमारच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर याचवर्षी आलेला पॅडमॅन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. अक्षयकडे सध्या एकापेक्षा एक चित्रपट आहेत. '2.0', 'हाऊसफुल', 'हेरा फेरी 3' तसेच यशराज राजच्या आगामी चित्रपट तो करिनाच्या अपोझिट असणार आहे. 
 
Web Title: New poster out of Akshay Kumar's 'Gold' film, release date confirmed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.