Neha is now painted with a whim of millions of precious stones, special and special talk, what is the matter? | नेहा धूपियाच्या लाखमोलाच्या लेंहग्यासोबत आता रंगते आहे या खास आणि विशेष गोष्टींची चर्चा,कोणती आहे ती गोष्ट?

सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष असते.आपला लाडका अभिनेता किंवा अभिनेत्री लग्नात काय परिधान करतात याकडं रसिकांच्या नजरा असतात.अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात तिच्या लेंहग्याची आणि तिने परिधान केलेल्या ९० लाख रुपये किंमतीच्या अंगठीची रसिकांमध्ये चर्चा रंगली. अनुष्का आणि विराट कोहली यांच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं होते.विराटने ऑस्ट्रेलियातील एका खास डिझायनरकडून अनुष्कासाठी खास अंगठी डिझाइन करुन घेतली होती.आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्न सोहळ्याची,लेंहग्याची आणि तिच्या अंगठीची चर्चा रंगली आहे. नुकतंच सोनम कपूर पाठोपाठ अभिनेत्री नेहा धूपियासुद्धा रेशीमगाठीत अडकली आहे.बॉयफ्रेंड अंगद बेदीसह पंजाबी पद्धतीने तिचं शुभमंगल पार पडलं. हे लग्न गुप्त पद्धतीने पार पडलं असलं तरी तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. लग्नात तिने परिधान केलेल्या लेंहग्याचीही तितकीच चर्चा रंगते आहे. मात्र या लग्नात नेहाच्या हातातल्या अंगठीने सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. नेहाने परिधान केलेली अंगठी ही तिच्यासाठी अमूल्य अशी आहे. ही अंगठी नेहाला बेदी कुटुंबीयांकडून वारसा हक्काने मिळाली आहे. ही अंगठी नव्या डिझाइनची नसून ती परंपरागत चालत आलेल्या डिझाइनची आहे. ही अंगठी बेदी कुटुंबाचा पारंपरिक दागिना आहे. ही अंगठी एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जात असते. त्यानुसार ही अंगठी आता नेहाकडे आली आहे. गेल्या वर्षभरापासून नेहा आणि अंगद यांचे प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती होती.या लग्नात वारसा हक्क असलेली महागडी अंगठी नेहाला देऊन नववधूचे स्वागत बेदी कुटुंबीयांत स्वागत करण्यात आलं.

Also Read:सोनम कपूरच्या 'या' लेहंग्याची किंमत ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल!

नेहाने तिच्या लग्नात गुलाबी रंगाचा आकर्षक असा लेंहगा परिधान केला होता.नेहाचा हा आकर्षक आणि सुंदर लेंहगा डिझायनर अनिता डोंगरे यांच्या कलेक्शनमधील होता.ब्लश गुलाबी रंगातील या लेंहग्यात नेहाचं सौंदर्य आणखीन खुलून गेलं होतं.यावेळी अनिता यांनी डिझाईन केलेली ज्वेलरी नेहाने परिधान केली होती.लेंहग्यावर चंदेरी एम्र्बॉयडरी करण्यात आली होती.दुपट्टा आणि चंदेरी ब्लाऊजसह त्याची मॅचिंग करण्यात आली होती.समर वेडिंगला लक्षात घेऊन नेहाचा हा आकर्षक असा लेंहगा डिझाईन करण्यात आला होता.लेंहग्यावरील गोटापट्टी वर्क, दरदोजी, रेशम, डोरी आणि सिक्वन वर्क त्याला आणखी आकर्षक बनवत होती.या लेंहग्याची किंमत जवळपास २ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Title: Neha is now painted with a whim of millions of precious stones, special and special talk, what is the matter?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.