Neha Dhupri car accident! People said instead of help, please help me! | ​नेहा धूपियाच्या गाडीला अपघात! मदतीऐवजी लोकांनी म्हटले, सेल्फी प्लीज!!

अभिनेत्री नेहा धूपिया अलीकडे एका अपघातातून थोडक्यात बचावली. चंदिगडमध्ये तिच्या कारला अपघात झाला. पण धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर मदत करण्याऐवजी लोकांनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. तिच्या आॅटोग्राफसाठी एकमेकांना धक्काबुक्की केली.
नेहा आपल्या शोच्या प्रमोशनसाठी चंदीगडला गेली होती. ही घटना गुरुवारची.प्रमोशन इव्हेंट आटोपून नेहा संध्याकाळी पाचच्या सुमारास विमानतळाकडे निघाली. अचानक वाटेत गाडीच्या ब्रेकमध्ये समस्या आली. एअरपोर्ट मार्गावर गाडी वळताच, गाडीचे ब्रेक फसलेत आणि तिची गाडी एका दुसºया गाडीवर धडकली. या अपघातात नेहाच्या कारच्या मागची काच फुटली. नेहाच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली.या अपघातानंतर अर्थात बघ्यांची गर्दी जमली. काही लोक गाडीच्या आत डोकावले आणि त्यांनी नेहाला ओळखले. मग काय, प्रत्येकजण नेहाची छबी टीपण्यासाठी तुटून पडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत नेहा धूपिया आहे, हे पाहून लोक मदत करण्याचे सोडून तिच्यासोबत सेल्फी घेऊ लागले. काहींनी तिच्यासमोर आॅटोग्राफसाठी आग्रह धरला. या प्रकारामुळे काही क्षण नेहालाही कसे रिअ‍ॅक्ट व्हावे कळेला. अपघातादरम्यान नेहाची गाडी रस्त्याच्या मधोमध थांबली. अनेक प्रयत्न करूनही ती स्टार्ट होईना. यामुळे रस्त्यावर २० मिनिटे जाम लागला. २० मिनिटांनंतर नेहासाठी दुसरी गाडी पोहोचली. ती त्या गाडीत चढली आणि विमानतळाकडे निघाली.
सध्या नेहा ‘नो फिल्टर नेहा’ या आॅडिओ शोच्या सीझन२ मध्ये बिझी आहे. नेहाच्या या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या बिनधास्त अंदाजात बोलतात. या शोच्या दुसºया सीझनमध्ये आत्तापर्यंत रणवीर सिंह, विद्या बालन, इम्तियाज अली असे सगळे सेलिब्रिटी येऊन गेलेत.
Web Title: Neha Dhupri car accident! People said instead of help, please help me!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.