Birthday Special : ज्युनिअर अ‍ॅक्टरने पाचदा हात धुतल्यानंतरचं नेहा धूपियाने त्याच्यासोबत दिला सीन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 10:33 AM2018-08-27T10:33:32+5:302018-08-27T10:38:03+5:30

Neha Dhupiya BirthDay Special: बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया हिचा आज (27 आॅगस्ट) वाढदिवस. सध्या नेहा प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. काल-परवाचं नेहा व तिचा पती अंगद बेदीने ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली. 

neha dhupia made junior actor wash hands 5 times before shooting dus kahaniyaan scene | Birthday Special : ज्युनिअर अ‍ॅक्टरने पाचदा हात धुतल्यानंतरचं नेहा धूपियाने त्याच्यासोबत दिला सीन!!

Birthday Special : ज्युनिअर अ‍ॅक्टरने पाचदा हात धुतल्यानंतरचं नेहा धूपियाने त्याच्यासोबत दिला सीन!!

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया हिचा आज (27 आॅगस्ट) वाढदिवस. सध्या नेहा प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. काल-परवाचं नेहा व तिचा पती अंगद बेदीने ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली. उण्यापुऱ्या तीन महिन्यांपूर्वी नेहाचे लग्न झाले. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती. पण नेहाने ही गोष्ट लपवून ठेवली. असे काहीही नाही, असेचं ती काल-परवापर्यंत सांगत राहिली.

नेहा धूपियाने १९९४ मध्ये बॉलिवूड डेब्यू केला होता. त्याअर्थाने तिचे बॉलिवूडमध्ये सुमारे २४ वर्षांचे करिअर राहिले आहे. नेहाच्या आयुष्याशी संबंधित अनेक रोचक गोष्टी आहेत, या गोष्टी तिचा स्वभाव आणि तिचा तोरा दाखवणा-या आहेत.

‘दस कहानियां’ या चित्रपटाशी संबंधित असाचं एक किस्सा. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान नेहाने आपल्या को-अ‍ॅक्टरला पाचदा हात धुवायला भाग पाडले होते. होय, दंगलखोरांपासून स्वत:चा जीव वाचवत एक मुस्लिम मुगला नेहा धूपियाच्या घरात शिरलो, असा एक सीन या चित्रपटात आहे. नेहा या मुलाला दंगलखोरांपासून वाचवण्यासाठी आपल्या टॉयलेटमध्ये लपवते. एक दंगलखोर त्या मुलाबद्दल माग घेत तिच्याघरी येतो आणि टॉयलेटमध्ये शिरू पाहतो, तेव्हा ती त्याला रोखण्यासाठी आपल्या अदांनी रिझवू पाहते. या सीनमध्ये संबंधित ज्युनिअर आर्टिस्टला नेहाच्या हाताचे चुंबन घ्यायचे होते. हा सीन करण्याआधी नेहाने त्या ज्युनिअर आर्टिस्टला पाचदा हात धुवायला लावले. त्याने पाचदा हात धुतल्यानंतरच तिने त्याच्यासोबत तो सीन दिला.

फार कमी लोकांना ठाऊक असेल की, नेहाने ‘नट्टू ओडुरू’ नावाच्या एका जपानी चित्रपटातही काम केले आहे. फावल्या वेळात कॉमिक्स बुक्स वाचणे, नेहाला आवडते. आजही वेळ मिळाला की, ती कॉमिक्स वाचायला बसते.
२००२ मध्ये मिस युनिव्हर्स पेजेंटमध्ये नेहा टॉप टेन कंटेस्टंटपैकी एक होती.

Web Title: neha dhupia made junior actor wash hands 5 times before shooting dus kahaniyaan scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.