Neha Dhupia chose honeymoon for this beautiful country! | नेहा धूपियाने हनीमूनसाठी निवड केली 'या' सुंदर देशाची !

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने गुरुवारी अभिनेता अंगद बेदी सोबत आनंद कारजची रीतिरिवाजानुसार विवाह बंधनात अडकले. नेहा आणि अंगदने आपले लग्न खूप गोपनिय ठेवले याची कुणकुण कानोकान कुणाला लागू दिली नाही. लग्नाची बातमी नेहा आणि अंगदने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. नेहा लग्नाच्या लंहग्यात खूप सुंदर दिसत होती. तिचा हा लंहगा प्रसिद्ध डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझायन केला होता. लग्नाच्या दिवशी दोघे दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट झाले. याचाच अर्थ नेहा आणि अंगद यांनी हनीमूनसाठी टेक ऑफ घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेहा आणि अंगद अमेरिकेत जाऊन काही दिवस राहणार आहेत. तिकडचे दोघे वेगवेगळ्या शहरात आपला हनीमून सेलिब्रेट करणार आहेत.  नेहा पेक्षा अंगद दोन वर्षांनी लहान आहे. अंगद हा पूर्व क्रिकेटर बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आहे. अंगद दिल्लीच्या 19 वर्षीय संघातून क्रिकेट खेळला आहे. नेहाच्या आधी अंगदचे नाव 'बिग बॉस' स्पर्धक असलेल्या नोरा फतेसोबत जोडण्यात आले होते.  नोराशी ब्रेकअप झाल्यानंतर अंगद आणि नेहामध्ये जवळीकता वाढल्याचे कळतेय. या मैत्रिचे रुपातंर मग प्रेमात झाले. गेल्या एक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते.  नेहाने बॉलिवूडशिवाय तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात देखील काम केले आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात रंगमंचावरुन केली आहे तसेच Euphoriaच्या म्युझिक व्हिडिओमध्ये सुद्धा ती झळकली होती. सन १९९४ मध्ये ‘मिन्नरम’ या मल्याळम चित्रपटाद्वारे नेहाने आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. तर बॉलिवूडमध्ये तिने अजय देवगणच्या अपोझिट कयामत या चित्रपटातून पाऊल ठेवले. यानंतर २००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला.अलीकडे नेहा ‘हिंदी मीडियम’, ‘तुम्हारी सुलू’, ‘जुली’ आदी चित्रपटांमध्ये दिसली. याशिवाय तिचा नो फिल्टर नेहा हा टॉक शो चांगलाच गाजतोय.

ALSO READ :  नेहा धूपियाच्या लग्नात ‘या’ क्रिकेटपटूंनी लावली हजेरी, पाहा फोटो!

 
Web Title: Neha Dhupia chose honeymoon for this beautiful country!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.