Negative role of Jacqueline to be successful | जॅकलिनला साकारायची निगेटिव्ह भूमिका

एक सौंदर्यवती, जिच्या सौंदर्यावर सारेच फिदा, तिची प्रत्येक अदा असते तितकीच खास, ती म्हणजे श्रीलंकन ब्यूटीक्वीन आणि बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस. आजवर जॅकलिननं हिंदी सिनेमात विविधरंगी भूमिका साकारल्यात. ग्लॅमरस, रोमँटिक आणि कॉमेडी अशा विविध सिनेमात जॅकलिननं आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. आता जॅकलिनला रुपेरी पडद्यावर निगेटिव्ह व्यक्तीरेखा साकारायची. सीएनएक्स लोकमतला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीमध्ये जॅकलिननं आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवलीय.
 
प्रत्येक कलाकाराला नाविन्यपूर्ण भूमिका करण्याची इच्छा असते. काही तरी वेगळं करुन रसिकांची मनं जिंकण्याची कलाकारांची इच्छा असते. बॉलिवूडमध्ये आजवर विविध रंगी भूमिका साकारल्यात. प्रत्येक भूमिकेला रसिकांनी तितकंच प्रेम दिलं. पहिल्या 'अलाद्दीन' या सिनेमापासून ते 'फ्लाईंग जाट'पर्यंत प्रत्येक सिनेमात काही ना काही वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केलाय. 'ब्रदर' या सिनेमात आईची भूमिकाही साकारली. ग्लॅमरस, रोमँटिक आणि कॉमेडी भूमिका तर करतच असते. मात्र त्याच त्याच प्रकारच्या भूमिकांऐवजी कलाकाराला वेगळ्या भूमिकेत पाहणं रसिकांना आवडतं. त्यामुळं आता आगामी काळात संधी मिळाल्यास निगेटिव्ह भूमिका साकारण्याची इच्छा आहे. तसंच नायिकाप्रधान सिनेमा करायलाही भविष्यात नक्की आवडेल.
 
श्रीलंकेन ब्यूटीक्वीन असल्याने कायमच मी हॉलिवुडमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतात. मात्र सध्या तरी मी बॉलिवुड एन्जॉय करतेय. भविष्यात एखादी चांगली भूमिका आणि चांगली कथा असलेला हॉलिवुडचा सिनेमा आल्यास करायला नक्की आवडेल. मात्र सध्या तरी बॉलिवूडने आणि इथल्या रसिकांनी मला भरभरुन प्रेम दिलंय. हे प्रेम आणि बॉलिवूडचे यश सध्या एन्जॉय करतेय.
 
आजवर बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसह काम केलंय. रितेश देशमुखपासून रणबीर कपूर,अक्षय कुमार, सलमान खान ते टायगर श्रॉफपर्यंत. प्रत्येक कोस्टारसोबत काम करण्याची मज्जा काही औरच आहे. प्रत्येकाकडून काही ना काही वेगळं शिकायला मिळालं. त्यातल्या त्यात दबंग सलमान खानसह काम करताना मात्र थोडं प्रोफेशनल वागावं लागतं. दुसरीकडे टागगर श्रॉफसोबत काम करताना तसा काही दबाव नसतो. दोघंही एकमेंकांना समजून घेतात.सलमान खानसुद्धा समजून घेतो. त्याच्यासोबत कामाचा अनुभव ग्रेटच असतो. त्यामुळं सध्या मी बॉलिवूड आणि इथले काम खूप खूप एन्जॉय करतेय.  

Suvarna.jain@lokmat.com
 
Web Title: Negative role of Jacqueline to be successful
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.