Nawazuddin Siddiqui said, before giving an intimate, I was nervous, gradually engrossed. | ​नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, इंटिमेट सीन्स देताना आधी मी नर्व्हस होतो, हळूहळू एन्जॉय केले

‘बाबुमोशाय बंदुकबाज’ या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला. इंटिमेट सीन्स,शिव्या आणि संवादाने भरलेला हा ट्रेलर तुम्ही पाहिला असेलच. ‘बाबुमोशाय’ नवाजुद्दीन सिद्दीकीचे एक वेगळेच रूप यात पाहायला मिळतेय. अनेकांसाठी तर ते कमालीचे शॉकिंग आहे. खरे तर नवाज जेही करतो ते पूर्ण प्रामाणिकपणे करतो. ‘बाबुमोशाय बंदुकबाज’मधील इंटिमेट आणि किसींग सीन्स पाहूनही हेच वाटते. या चित्रपटात नवाजुद्दीनने प्रथमच लिप किसींग सीन्स आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. नवाजसाठी हा अनुभव कसा होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता   तुम्हाला असेलच. ‘बाबुमोशाय बंदुकबाज’च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी नवाजला याबद्दल विचारण्यात आले.  किसींग सीन्स देतानाचा तुझा अनुभव कसा होता? असा प्रश्न त्याला विचारला गेला. यावर नवाजचे उत्तर आश्चर्याचा धक्का देणारे होते. ‘किसींग देतांना मी प्रचंड नर्व्हस होतो. कारण हा माझा पहिला लिप किस होता. माझ्या करिअरमध्ये असा सीन मी याआधी कधीही दिलेला नव्हता. त्यामुळे मी घाबरलो होतो. पण नंतर मी एन्जॉय केले. तुम्ही कुठल्याही कामात असता तेव्हा तुमचे लक्ष दुसरीकडे जात नाही,’ असे नवाज म्हणाला. त्याचे हे उत्तर ऐकून सगळ्यांनाच हसू आवरणे कठीण झाले.नवाजकडून कुणीही अशा उत्तराची अपेक्षाच करू शकत नाही. पण शेवटी काळासोबत बदलावे लागतेच ना. नवाजुद्दीनने हा बदल स्वीकारला म्हणायचा. नवाजने ‘बाबुमोशाय बंदुकबाज’मध्ये ज्या अभिनेत्रीसोबत किसींग सीन्स दिले आहेत, तिचे नाव बिदिता बेग आहे. बिदिता ही बंगाली अभिनेत्री आहे. तिच्याशिवाय ताहिर भसीन, दिव्या दत्ता यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या आॅगस्टमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ALSO READ : ​‘बाबुमोशाय बंदुकबाज’चा ट्रेलर आला!
 
Web Title: Nawazuddin Siddiqui said, before giving an intimate, I was nervous, gradually engrossed.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.