नवाजुद्दीन सिद्दीकी व सोनाक्षी सिन्हा पहिल्यांदाच एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 06:31 PM2019-02-19T18:31:45+5:302019-02-19T18:32:09+5:30

सोनाक्षी सिन्हा नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

Nawazuddin Siddiqui and Sonakshi Sinha will be seen together for the first time in this film | नवाजुद्दीन सिद्दीकी व सोनाक्षी सिन्हा पहिल्यांदाच एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर

नवाजुद्दीन सिद्दीकी व सोनाक्षी सिन्हा पहिल्यांदाच एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देसोनाक्षी सिन्हा व नवाजुद्दीन सिद्दीकी 'बोले चुडिया' चित्रपटात दिसणार एकत्र

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘टोटल धमाल’ या चित्रपटातील ‘मुंगडा’ या गाण्याच्या रिमेकमध्ये सोनाक्षीने दमदार डान्स करीत प्रेक्षकांनादेखील थिरकायला लावले. अनेकांनी या गाण्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. या गाण्यानंतर सोनाक्षी लवकरच ‘कलंक’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त तिला आणखीन एका सिनेमाची ऑफर मिळाल्याचे समजते आहे आणि या चित्रपटात ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झळकणार आहे. 
 
सोनाक्षी सिन्हा व नवाजुद्दीन सिद्दीकी 'बोले चुडिया' चित्रपटात एकत्र दिसणार असून नवाजचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शमास या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध घेत होता. त्याचा हा शोध आता पूर्ण झाला असून त्याने सोनाक्षीची मुख्य अभिनेत्री म्हणून निवड केली असल्याचे समजते आहे. तसेच सोनाक्षीनेदेखील या चित्रपटासाठी होकार दिला आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. बोले चुडिया व्यतिरिक्त सोनाक्षी ‘कलंक’, ‘मिशन मंगल’, ‘दबंग ३’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तर नवाज सध्या मोतीचुर या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. नवाज व सोनाक्षीला एकत्र स्क्रीनवर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Nawazuddin Siddiqui and Sonakshi Sinha will be seen together for the first time in this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.