Naukhi was supposed to kill the actress in the womb; Today's name earned worldwide! | नकोशी म्हणून ‘या’ अभिनेत्रीची गर्भातच करणार होते हत्या; आज जगभरात कमाविले नाव!

‘अय्यारी’ या चित्रपटात बघावयास मिळणारी अभिनेत्री पूजा चोपडा हिची कथा त्या नकोशीप्रमाणे आहे, जिला तिचे आई-वडील या जगात येण्याअगोदरच संपविण्याचा विचार करतात. होय, एका न्यूज वेबसाइटशी बोलताना स्वत: पूजानेच तिच्या आयुष्याशी संबंधित या भयंकर आणि तेवढ्याच कटू सत्याविषयी सांगितले. पूजाने म्हटले की, ‘जेव्हा मी माझ्या आईच्या गर्भात होती तेव्हाच माझ्या वडिलांनी फरमान सोडला होता की मला मुलगी नको. एवढेच काय तर जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील रूग्णालयात मला बघण्यासाठीदेखील आले नव्हते. जेव्हा मी केवळ २० दिवसांची होती, तेव्हा वडिलांनी माझ्या आईला घराबाहेर काढले होते.’ पूजाच्या मते, तिच्या वडिलांनी आईकडे एक अट ठेवली होती, एक तर तिने मला सोडून द्यावे किंवा घर सोडून जावे.पूजाने यावेळी हेदेखील स्पष्ट केले की, त्यावेळी माझी मोठी बहीण सात वर्षांची होती. माझी आई आम्हा दोघी बहिणींना कोलकाता येथून मुंबई येथे माहेरी आली. आम्हा दोघी बहिणींच्या पालनपोषणासाठी माझ्या आईने खूप कष्ट केले असेही पूजाने सांगितले. पूजा तिच्या आईला ‘फायटर’ असे संबोधतांना मुलीला कधीच कमी लेखू नये, असेही सांगते. दरम्यान, ३ मे १९८६ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या पूजाने २००९ मध्ये मिस इंडियाचाही किताब पटकावला. शिवाय याच वर्षी ती मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झाली होती. पूजाने दिग्दर्शक मधूर भंडारकर यांच्या ‘फॅशन’ आणि ‘हिरोइन’ या चित्रपटात भूमिका साकारल्या. पहिंल्यांदा ती ‘पोनर शंकर’ या तेलगू चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. बॉलिवूडमध्ये तिने ‘कमांडो : अ वन मॅन आर्मी’ आणि ‘ये तो टू मच हो गया’ या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत काम केले. सध्या ती ‘अय्यारी’मध्ये बघावयास मिळत असून, या चित्रपटात ती कॅप्टन माया सेमवाल यांची भूमिका साकारत आहे. 
Web Title: Naukhi was supposed to kill the actress in the womb; Today's name earned worldwide!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.