'Nasheeda climbed ...' you will hear about the addiction! | ‘नशे सी चढ गई...’ ऐकून तुम्हालाही चढेल नशा!

अभिनेता रणवीर सिंह आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’मधील नवे गाणे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील रणवीर व वाणीच्या डान्स स्टेप्स्, मूव्स एकदम हटके आहेत. आदित्य चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट आधीच त्यातील ‘किसींग सीन्स’मुळे चर्चेत आहे. आज या चित्रपटातील ‘नशे सी चढ गई...’ हे गाणे रिलीज झाले. पॅरिसच्या रस्त्यांवर चित्रीत करण्यात आलेल्या या ‘पार्टी अँथम’मध्ये रणवीर व वाणीची जबरदस्त केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. गाण्याच्या शेवटी दोघेही एकमेकांच्या प्रेमात गढून जातात. 
हे गाणे पाहिल्यानंतर शाहरूख खान व कॅटरिना कैफ यांच्यावर चित्रीत ‘जब तक है जान’मधील ‘इश्क शवा...’ हे गाणे तुम्हाला आठवू शकते.  ‘नशे सी चढ गई...’ हे गाणे तुम्हाला थिरकायला भाग पाडू शकते.
अलीकडे पॅरिसच्या आयफेल टॉवरवर ‘बेफिक्रे’चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.  तत्पूर्वी किसींग सीन्सचे या चित्रपटाचे पोस्टर्स गाजले..यानंतर आज रिलीज करण्यात आलेले हे नवे गाणे रिलीज किती गाजतेय,ते आपण पाहुयात!


Web Title: 'Nasheeda climbed ...' you will hear about the addiction!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.