Nargis Fakhri and Uday Chopra have nothing right! Proof of this !! | ​नर्गिस फखरी अन् उदय चोप्रा यांच्यात नाही काहीही ठीक! हा घ्या पुरावा!!

यावर्षी मे महिन्यात नर्गिस फखरी अभिनेता उदय चोप्रासोबत स्पॉट झाली होती. मुंबई एअरपोर्टवर दोघेही एकत्र बाहेर पडत असताना मीडियाने या दोघांना घेरले होते. पण मीडियाला बघताच, नर्गिसने आपला चेहरा स्कार्पने झाकून घेतला होता. मग काय? नर्गिस व उदय या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चेने पुन्हा जोर धरला होता. खरे तर गतवर्षी दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. यामुळे नर्गिस डिप्रेशनमध्ये गेल्याचेही कानावर आले होते. अर्थात नर्गिसने हे वृत्त नाकारले होते. शिवाय उदय व ती रिलेशनशिपमध्ये आहे, याचेही तिने खंडन केले होते. पण यानंतर सुमारे वर्षभरानंतर दोघेही एकत्र विमानतळावर दिसले म्हटल्यावर चर्चा तर होणारच. नर्गिस व उदय लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार, असेही या चर्चेदरम्यान ऐकवात आले होते. पण दोघांमध्येही सध्या काय सुरु आहे, हे कळायलाच मार्ग नाही. तूर्तास तरी लग्नाची नाही तर दोघांमधील ब्रेकअपचीच बातमी सध्या खरी वाटतेय. आता तुम्ही म्हणाल कशावरून तर त्यांच्या सोशल अकाऊंटवरून. मध्यंतरी नर्गिस व उदय यांच्या ब्रेकअपची बातमी येऊनही दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फ्रेन्ड होते.पण कदाचित आता परिस्थिती बदललीय. कारण नर्गिसने उदयला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. आता या अनफॉलोचा अर्थ तूर्तास तरी ‘आॅल इज नॉट वेल’ असाच निघतोय.

ALSO READ : काय म्हणता? नर्गिस फखरी लग्नापूर्वीच प्रेग्नंट??

खरे तर  जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही. उदय ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल, ते त्याचे नशीब,असे मी म्हणेल. तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल, असे नर्गिस एका मुलाखतीत म्हणाली होती. पण आता याचा अर्थ काय, हे तिलाच ठाऊक. सध्या उदय त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या कामात बिझी आहे. तर नर्गिस ‘5 वेडिंग्स’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत झळकणार आहे. या वेळेपर्यंत इतकेच. नर्गिस व उदयबद्दल आणखी काही अपडेट्स आलेच तर आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला उशीर करणार नाहीच!!
Web Title: Nargis Fakhri and Uday Chopra have nothing right! Proof of this !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.