Nana Patekar who earns a crore of crores of lives, lives in one of the BHK flats ... | ​करोडोची कमाई करणारे नाना पाटेकर या कारणामुळे राहातात वन बीएचके फ्लॅटमध्ये...

नाना पाटेकर यांनी मराठी आणि बॉलिवूडमध्ये त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या अभिनयावर आज त्यांचे फॅन्स फिदा आहेत. बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. आज त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी तर नटसम्राट, सिंहासन, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटेः द रिअल हिरो यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नाना पाटेकर यांनी मराठी आणि बॉलिवूडमध्ये अनेक वर्षं काम केल्याने त्यांनी चांगलाच पैसा कमवला आहे. त्यांच्याकडे आज करोडोने संपत्ती आहे. 
नाना हे करोडपती असले तरी ते एका साध्या वनबीएचके फ्लॅटमध्ये राहातात. नानांचा हा फ्लॅट मुंबईत असून या फ्लॅटमध्ये ते त्यांच्या आईसोबत राहातात. नाना पाटेकर यांनी या इतक्या छोट्या फ्लॅटमध्ये राहाण्यामागे एक खास कारण आहे. प्रत्येकाने आपल्या गरजेनुसारच खर्च केला पाहिजे असे त्याचे स्पष्ट मत आहे आणि त्यामुळेच ते अगदी लहान घरात राहाणे पसंत करतात. ते गेल्या अनेक वर्षांपासून त्याच घरात राहात आहेत. नानांचे राहाणीमान देखील साधे आहे. ते अनेक वेळा साध्या भारतीय पेहरावात पाहायला मिळतात. 
नाना अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी कोणता व्यवसाय करायचे हे तुम्ही ऐकले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. नाना अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग पेंटिंगचे काम करायचे. त्यासाठी त्यांना खूपच कमी पैसे मिळायचे. 
नाना यांचा १ जानेवारी म्हणजेच आज वाढदिवस असून ते ६७ वर्षांचे झाले आहेत. आजही या वयात ते तितक्याच जोशाने काम करत आहेत. त्यांचा आपला मानूस हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नाना यांचा जन्म मुरूड जंजिरातील एका सामान्य कुटुंबातील आहे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत झाले असून नाना आणि नीलकांती यांनी प्रेमविवाह केला होता. त्या दोघांना मल्हार हा मुलगा असून सध्या ते दोघे वेगळे राहात आहेत. 

Also Read : नाना पाटेकर यांना मल्हारशिवाय देखील होता आणखी एक मुलगा... जाणून घ्या नानाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी
Web Title: Nana Patekar who earns a crore of crores of lives, lives in one of the BHK flats ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.