Nana Patekar was shocked to see this room with actress Manisha Koirala! | नाना पाटेकरला ‘या’ अभिनेत्रीसोबत रूममध्ये बघून संतापली होती मनीषा कोईराला!

बॉलिवूडमध्ये बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांच्या अफेअरची चर्चा बी-टाउनमध्ये सहजतेने चर्चिली जाते. त्यामध्ये अभिनेता नाना पाटेकरचेही नाव आहे. ९० च्या दशकात नानाचे अभिनेत्री मनीषा कोईरालासोबत अफेअर असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या दोघांच्या स्वभावाबद्दल सांगायचे झाल्यास, नाना त्याच्या रागीट स्वभावासाठी, तर मनीषा हट्टी स्वभावासाठी ओळखली जाते. परंतु अशातही या दोघांमध्ये अफेअर होते. वृत्तानुसार मनीषा नानासोबत लग्न करू इच्छित होती. परंतु नाना अगोदरच विवाहित होता. असो, आज आम्ही तुम्हाला नाना आणि मनीषाशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत. जेव्हा मनीषाने नानाला अन्य एका अभिनेत्रीसोबत रूममध्ये बघितले होते, तेव्हा तिचा असा काही पारा चढला होता की, हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले होते. 

वास्तविक हा किस्सा १९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटादरम्यानचा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पार्थो घोष यांनी केले होते. तर चित्रपटात नाना पाटेकर, मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याकाळी नाना आणि मनीषाच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. असे म्हटले जाते की, मनीषा नानावर एवढे प्रेम करायची की, तिने त्याच्यानुसार स्वत:च्या स्वभावात बदल केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार तर मनीषा नानासोबत लग्न करण्याची तयारी करीत होती, परंतु नाना त्यावेळी विवाहित होता. कदाचित याच कारणामुळे दोघांनी लग्न केले नाही. मात्र अशातही मनीषा नानावर प्रचंड प्रेम करीत होती. नानाविषयी ती खूपच मजेसिव्ह होती. त्यामुळे नानासोबत दुसºया कोण्या महिलेला बघणे ती अजिबातच पसंत करीत नव्हती. मात्र एक दिवस तेच घडले ज्याची भीती होती. 

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकेदिवशी मनीषाने नानाला एका दुसºयाच  अभिनेत्रीसोबत रूममध्ये बघितले होते. शूटिंग संपल्यानंतर जेव्हा रात्री मनीषा नानाच्या मेकअप रूममध्ये पोहोचली तेव्हा नाना अभिनेत्री आयशा जुल्कासोबत तिला बघावयास मिळाला. आयशाला नानासोबत बघून मनीषाचा पारा असा काही चढला की, तिने जोरजोरात आयशावर ओरडण्यास सुरुवात केली. मनीषाचा हा अवतार बघून आयशालादेखील चांगलाच संताप आला. तिनेही मनीषावर ओरडण्यास सुरुवात केली. दोघींमधील वाद एवढा काही पेटला होता की, त्यांच्यात चक्क हाणामारी झाली. त्यानंतर नाना पाटेकर मध्यस्थी करीत दोघींनाही शांत केले. 
Web Title: Nana Patekar was shocked to see this room with actress Manisha Koirala!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.