बॉलिवूडमधील दिग्दर्शक द्वय अब्बास मस्तान यांच्या आगामी ‘मशीन’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातून दिग्दर्शक अब्बास बर्मावालाचा मुलगा मुस्तफा बॉलिवूड डेब्यू करतो आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी हिची भूमिका असून हा चित्रपट मागील काही दिवसांत आपल्या रिलीज डेटमुळे चर्चेत आला होता.

‘मशीन’ हा चित्रपट देखील अ‍ॅक्शन थ्रिलर असून यात मुस्तफा व कियारा अडवाणी यांचा भरपूर रोमांस पहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. २ मिनीट ४४ सेंकदाचा ट्रेलर पाहिल्यावर या चित्रपटात रोमांससह दमदार अ‍ॅक्शन दृष्ये साकारण्यात आली असल्याचे दिसते. मशीन हा रिव्हेंज मुव्ही आहे असे म्हणायला हरकत नाही. ट्रेलरमध्ये कियारा व मुस्तफा यांच्या भूमिकांवर फोकस करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये असलेली अभिनेता दलीप ताहिल यांची उपस्थिती रोमांच वाढविणारी आहे. हा चित्रपट १७ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. मशीनच्या ट्रेलर लाँच प्रसंगी अभिनेता मुस्तफा याने शाहरुख खानची प्रशंसा क रीत माझा आवडता अभिनेता असल्याचे सांगितले. मुस्तफा म्हणाला, मी शाहरुखचे चित्रपट पाहून मोठा झालो आहे, मला त्याचे सर्वच चित्रपट आवडतात. त्याच्याकडे असीम ऊर्जा आहे. तो ज्या भूमिका किंवा दृष्ये साकारतो त्यांना तो जिवंत करतो.

मशीन या चित्रपटात कि यारा अडवाणीची प्रमुख भूमिका असून यापूर्वी तिने एम.एस. धोनी, फगली या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक अब्बास मस्तान हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात अशा वेळी ‘मशीन’ त्याच्याच शैलीतील चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. अब्बास मस्तान या जोडीने दिग्दर्शित आतापर्यंत बाजीगर, अजनबी, रेस आणि रेस 2 या सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केल आहे.

">http://

Web Title: Mustafa-Kira Advani's 'Machine' Trailer Release
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.