Musician Anushka Shankar shared a photo of breastfeeding. | संगीतकार अनुष्का शंकरने स्तनपान करतानाचा फोटो केला शेअर!!

प्रसिद्ध संगीतकार अनुष्का शंकरने आपल्या वॅरिफाइड ट्विटर हॅण्डलवर काही फोटोज् शेअर केले, ज्यामधील एका फोटोत ती आपल्या मुलाला ब्रेस्ट फिडिंग करताना बघावयास मिळत आहे. अनुष्काने हे फोटो शेअर करताच यूजर्सकडून त्यास विविध स्वरूपाच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. मात्र हा फोटो शेअर करतानाच कॅप्शनमध्ये अनुष्काने अशा प्रतिक्रिया देणाºया लोकांना खडेबोल सुनावले आहेत. अनुष्काने लिहिले की, ‘तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी मी दुसºयांदा आई बनली. मला स्वत:वर अभिमान वाटतो की, हे घडवून आणण्यासाठी माझ्या शरीराने मला साथ दिली.’

यावेळी अनुष्काने मला माझ्या शरीराचा अभिमान वाटत असल्याचेही म्हटले. यावेळी अनुष्काने आणखी काही फोटोज् अपलोड केले. ज्यामध्ये तिचा तीन वर्षांचा मुलगा दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये ती गर्भवती असल्याचे दिसत आहे. तर अन्य एका फोटोत ती सितार वाजविताना दिसत आहे. अनुष्काचे हे फोटो तिच्या चाहत्यांकडून पसंत केले जात आहेत, तर काहींकडून तिला ट्रोलही केले जात आहे. 
 }}}} ">3 years ago today, I became a mother for the 2nd time. I take pride in the miracle that my body accomplished, and in the commitment I made to him in my soul. So, while I say happy birthday to my child, I also, quietly, proudly and with infinite gratitude, say it to myself. pic.twitter.com/YSabqQqhRs

— Anoushka Shankar (@ShankarAnoushka) February 17, 2018
कारण स्तनपान करतानाच्याच फोटोला सर्वाधिक वादग्रस्त कॉमेण्ट दिल्या जात आहेत. अनेकांनी तिला उपदेश देताना संस्कृतीची जाणीव करून देण्याचाही प्रयत्न केला आहे. असो, अनुष्काचे हे सर्व फोटो तिच्या चाहत्यांकडून मात्र तुफान लाइक केले जात आहेत. त्याचबरोबर तिच्या चिमुकल्याला शुभेच्छा देणाºया कॉमेण्टही दिल्या जात आहेत. 
Web Title: Musician Anushka Shankar shared a photo of breastfeeding.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.