अरबाज खान व मलायका अरोरा यांच्यातील दुरावा निर्माण झाल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. अरबाजसोबतच्या नात्याविषयी कुणी काही बोललेलेही मलायकाला अलीकडे चालत नाही. या दुराव्यामुळे मलायका दुखी असेल असे जर वाटत असेल, तसे नाहीच मुळी. खुद्द मलायकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो पाहून तरी किमान तसे वाटत नाही. या फोटोत न्युर्याकमध्ये एका कार्यक्रमासाठी पोहोचलेली मलायका बिनधास्त पार्टीमूडमध्ये दिसतेय. 
">http://

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनॉल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मलायका अरोरा देखील सहभागी झाली होती. या कार्यक्रमानंतर तिने पार्टी एन्जॉय केली. नेहमीप्रमाणे ती या पार्टीतही हॉट लुकमध्ये दिसली. यावेळी तिच्यासोबत तिची मैत्रिण सोफी चौधरी देखील होती. या पार्टीचे फोटो शेअर करून मला कोणतेच दु:ख नाही,असेच जणू मलायकाने सुचवले.

अरबाज खान व मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील हॉट कपल मानले जात होते. दोघांमधील प्रेमही जगजाहीर होते. मात्र अचानक यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यातच अरबाजच्या वाढदिवसाला उपस्थित राहून मलायकाने सगळ्यांनाच एक सुखद धक्काही दिला. पण अखेर हे नाते विस्कटलेच. यानंतर तर  अरबाजचा विषय काढल्यास मलायकाचा राग अनावर झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या.  ​">
 
Web Title: Mullaaka's unambiguous style
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.