The movie will be seen by Zee Classic Vahinivar on 'Doom from Doom to Qayamat Tak' | ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार झी क्लासिक वाहिनीवर

रोमिओ आणि ज्यूलिएटची प्रेमकथा ही जागतिक साहित्यातील एक अजरामर आणि अभिजात प्रेमकथा आहे. २९ एप्रिल १९८८ रोजी बॉलिवूडने या कथेची भारतीय आवृत्ती प्रदर्शित केली होती. ‘कयामत से कयामत तक’ने प्रेक्षकांची मने तात्काळ जिंकली आणि लोकप्रियतेचा नवा उच्चांक गाठला. ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३० वर्षं पूर्ण होत असल्याबद्दल आपल्या ‘वो जमाना, करे दीवाना’ या ध्येयधोरणास अनुसरून ‘झी क्लासिक’ वाहिनी रविवार, २९ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता या चित्रपटाचे प्रसारण करणार आहे.
१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ या विलक्षण लोकप्रिय चित्रपटातील आमिर खान व जूही चावला या नवोदित अभिनेत्यांना या चित्रपटाने रातोरात सुपरस्टार बनवले. पण या चित्रपटाची स्क्रीन टेस्ट देण्यासाठी आमिर खाननेच जूही चावलाला मदत केली होती, ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे काय? जूहीला ‘यादों की बारात’ चित्रपटातील एक प्रसंगावर अभिनय करण्यास सांगण्यात आले होते, तेव्हा ती त्या प्रसंगाची पटकथा घेऊन आमिर खानकडे आली आणि तेव्हा त्याने तिला मदत केली होती. या चित्रपटाचे निर्माते नासिर हुसेन यांच्या घरात तिने ही स्क्रीन टेस्ट दिली होती. त्यानंतर मात्र या अभिनेत्रीला कधी मागे वळून पाहावेच लागले नाही. 
चित्रपटाचा दिग्दर्शक मन्सूर खान याचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता आणि त्यात आलोकनाथ, गोगा कपूर, दलिप ताहिल, बीना बॅनर्जी, रिमा लागू, अर्जुन, राज झुत्शी वगैरे कलाकार होते. चित्रपटाला आनंद-मिलिंद या नव्या दमाच्या जोडीने संगीत दिले होते. या चित्रपटातील पापा कहते है, गझब का दिन, ऐ मेरे हमसफर इक जरा इंतजार, अकेले है तो क्या गम है ही गाणी प्रचंड हिट झाली होती. 
या चित्रपटात धनराज सिंह आणि रणधीर सिंह या दोन ठाकूर घराण्यांतील वैराचे चित्रण केले आहे. मात्र एकमेकांचे तोंडही न पाहण्याच्या प्रतिज्ञा घेतलेल्या या घराण्यातील पुढील पिढी राज (आमीर खान) आणि रश्मी (जूही चावला) एकमेकांच्या प्रेमात पडते, तेव्हा प्रचंड मोठा तणाव निर्माण होतो. या चित्रपटाची ही कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. 

Also Read : 'या' अभिनेत्याच्या मदतीसाठी धावून आले तिन्ही खान !
Web Title: The movie will be seen by Zee Classic Vahinivar on 'Doom from Doom to Qayamat Tak'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.