This movie will be seen on the occasion of the birthday of the disco dancer, Mithodda | डिस्‍को डान्‍सर मिथुनदाच्या वाढदिवसा निमित्त पाहायला मिळणार हा सिनेमा

१९७६ साली चित्रपटसृष्‍टीत एका उंच, सावळ्या  आणि  देखण्‍या कलाकाराने प्रवेश केला. १६ जून १९५२ रोजी जन्‍म झालेल्‍या मिथुन चक्रवर्ती यांनी ख-या अर्थाने त्याकाळातील चित्रपटसृष्‍टीतील नायकाच्‍या भूमिकेची प्रतिमाच बदलून टाकली. त्‍यांनी स्‍वत:च एकदा कबूल केले की, ''अभिनेता बनण्‍याची माझी महत्‍त्‍वाकांक्षा नव्‍हती, पण बळेच मी या क्षेत्रात आलो''. मिथुनचे बॉलिवूडमधील करियर एखाद्या चमत्‍कारापेक्षा कमी नाही. एक ज्‍युनिअर आर्टिस्‍ट ते एक राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेता अभिनेता व एक सुपरस्‍टार, मिथुनदांचे जीवन ब-याचजणांकरिता प्रेरणादायी आहे. त्याकाळी इतरांहून वेगळे ठरवणारी त्यांची विशेषता म्‍हणजे त्‍यांचा लूक, वेगळ्या पण ट्रेंड स्‍थापित करणा-या डान्‍स मूव्‍ह्ज आणि कलात्मक सिनेमे व व्‍यावसायिक सिनेमे अशा दोन्ही ठिकाणी उत्‍कृष्‍ट काम करण्‍याची त्‍यांची लकब.        

भारताच्‍या ख-या डिस्‍को डान्‍सरचा ६८ वा वाढदिवस साजरा करण्‍याकरिता, सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍सचे भारताचे अनोखे हिंदी मूव्‍ही चॅनेल सोनी मॅक्‍स 2 'स्‍वर्ग से सुंदर' हा १९८६ साली प्रदर्शित झालेला सुपर हिट कौटुंबिक चित्रपट केवळ सोनी मॅक्‍स 2वर शनिवार १६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसारित करणार आहे.

'स्‍वर्ग से सुंदर' ही विजय (जितेंद्र) हा गावचा सरपंच आणि त्‍याचा लहान भाऊ रवी (मिथुन चक्रवर्ती) या दोन भावांची कथा आहे. रवी आपल्‍या आईवडिलांपेक्षाही आपला भाऊ व वहिनी लक्ष्मी (जयाप्रदा)वर प्रेम करतो आणि त्‍यांचा आदर करतो. गावामध्‍ये सर्वजण त्‍यांच्‍या कुटुंबाकडे सुखी कुटुंब म्‍हणून पाहतात. विजयचा प्रतिस्‍पर्धी मिलावटराम (कादर खान)ची मुलगी ललिता (पद्मिनी कोल्‍हापुरे)वर रवीचे प्रेम असते. तिच्‍याशी लग्‍न केल्‍यानंतर मात्र सगळं चित्र पालटतं. ललि‍ता व लक्ष्‍मी एकाच वेळी गरोदर राहतात, पण हा आनंद काही काळापुरताच असतो. ललिताचे मूल जन्‍माच्‍या वेळी मृत्‍यू पावते, तर लक्ष्‍मीला मुलगा होतो.लक्ष्‍मी आणि विजय आपले मूल ललिता व रवीला द्यायचे ठरवतात. तथापि, येथेच कहाणी नकारात्‍मक वळण घेऊ लागते. ज्‍या मुलाने कौटुंबिक बंध घट्ट केले पाहिजेत, तो कौटुंबिक कलहाचे कारण बनतो.


 
Web Title: This movie will be seen on the occasion of the birthday of the disco dancer, Mithodda
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.