"This movie was for me DREAM COMES TRUE" | ''हा चित्रपट माझ्यासाठी होता DREAM COMES TRUE''

बॉलिवूडजगात आता आणखीन एक नवा चेहरा लाँच होणार आहे.दिल्लीत राहणारी अन्या सिंग कैदी बँड या यश राज बॅनरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. रसिकांची मनं जिंकण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. दिल्ली ते बॉलिवूड असा प्रवास केलेल्या अन्या सिंगसोबत केलेली ही खास बातचित.

चित्रपट मिळाल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती ?
मी निशब्द झाले होते. काय रिएक्ट करु हे कळतच नव्हते. मी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरत होते. आदित्य चोप्राला भेटले तेव्हा मी फारच नव्हर्स होते आणि  खूप खूश पण होतो. आजही मला झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही आहे. माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात आनंदाचा क्षण होता असे मी नक्कीच म्हणणे. मी ही न्यूज फॅमिलीसोबत शेअर करण्यासाठी  दिल्लीला गेले. माझ पूर्ण फॅमिली दिल्लीला राहाते. फॅमिलीसोबत जाऊन मी हा आनंद शेअर केला. मुंबईत असताना मी ऑडिशनला जाऊन आल्यावर आई, आजी- आजोबा रोज फोन करुन विचारायचे आज काय झाले ?, काम मिळाले की नाही ? असे प्रश्न ते रोज मला विचारायचे. माझ्यासोबत माझी फॅमिलीसुद्धा एक्सायटेड होती आणि कुठे तरी त्यांना भीतीदेखील होती. मात्र मला मिळालेल्या या ब्रेकनंतर ते ही खूप खूश आहेत.  

यश राज बॅनरने आतापर्यंत अनेक नव्या चेहऱ्यांना पडद्यावर झळकण्याची संधी दिली आहे, आता यात तुझे नावदेखील सामील होत आहे का सांगशील ?
यशराज बॅनरचे रोमाँटिक चित्रपट बघूनच मी मोठे झाले आणि तेव्हा ठरवले होते आपल्याला सुद्धा असेच काही तरी करायचे आहे. पण माझ्यासाठी हे स्वप्न फार दूर दिसत होते. अभिनेत्री होण्याची स्वप्न बघताना मला कधीही यश राज बॅनरमधून डेब्यू करण्याची संधी मिळले असे वाटले नव्हते. याआधी अनेक मोठे कलाकार यश राजने बॉलिवूडला दिले आहे. त्यामुळे ही संधी आयुष्यात कधी आपल्याला मिळेल असे खरचं वाटले नव्हते. याला मी देवाचे आशीवार्द माझ्यासोबत आहेत असे समजते. 

तुझ्याघरातून कोणीही अभिनय क्षेत्रात नसताना तुझ्यासाठी या क्षेत्रात येणे किती आव्हानात्मक होते ?
माझे आजोबा निवृत्त आर्मी ऑफिसर आहेत, आजी प्रिन्सिपल आहेत तर बाब डॉक्टर आहेत त्यामुळे एकंदरीत घरात शिस्तीचे आणि शिक्षणाचे वातावरण होते. त्यामुळे मी जर घरात मला अभिनयात करिअर करायचे आहे असे सांगितले तर कोण कसे रिअॅक्ट होईल या गोष्टीची मला भीती वाटत होती. मी हॉस्टेलमध्ये असताना अनेक वेळा गाण्यात आणि डान्सनमध्ये सहभाग घायची मात्र त्यावेळी अभिनायात करिअर करायचे आहे असे काही डोक्यात नव्हते. 12 वीनंतर मला अभिनयात करिअर करायचे आहे हे मी ठरवले. त्यानंतर मी याबाबत आईशी बोलले तिने सांगितले आधी शिक्षण पूर्ण कर मग आपण याबाबत विचार करु. शिक्षण पूर्ण झाल्यावर मला आईने एक वर्षाचा कालावधी दिला. मी मुंबईत आले इकडे इथे मी कुणालाच ओळखत नव्हते.1 वर्ष फक्त ऑडिशन्स देते होते. सगळीकडून नकार येत होता. काही महिन्यांपूर्वीच मी घरी दिल्ली गेले होतो तेव्हा मी सांगूनच आले होते सप्टेंबरपर्यंत जर मला काही काम मिळाले नाही तर मी परत येईन. त्यामुळे इथपर्यंतचा माझा प्रवास माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. 

या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील ?
मी यात बिंदू नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. बिंदू ही एका आशावादी मुलगी असते. ती टॉम बॉय टाईम असते आणि जेलच्या भिंतीमधून आपण सुटणारच असा आत्मविश्वास तिच्यात असतो.  

एक कलाकार म्हणून सोशल मीडिया तुझ्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे ? 
याआधी मी कधी ही सोशल मीडियावर कधीच अॅक्टिव्ह नव्हते मात्र अभिनेत्री झाल्यावर तुम्हाला सोशल मीडियाच्या संपर्कात रहावेच लागते. खूप वेळा लोक तुमच्या फोटोंविषयी कमेंट करतात ज्या सगळ्यात तुम्हाला आवडत नाहीत. मात्र अभिनेत्री म्हणून बऱ्याच गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करावे लागते.  
Web Title: "This movie was for me DREAM COMES TRUE"
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.