मौनी रायने साईन केला पाचवा चित्रपट! नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत जमणार जोडी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:00 PM2019-03-11T13:00:13+5:302019-03-11T13:01:10+5:30

‘देने वाला जब भी देता है छप्पर फाड कर देता है,’ अशी एक हिंदी म्हण आहे. तूर्तास तरी मौनी रायला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते.

mouni roy to star opposite nawazuddin siddiqui in bole chudiyan | मौनी रायने साईन केला पाचवा चित्रपट! नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत जमणार जोडी!!

मौनी रायने साईन केला पाचवा चित्रपट! नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत जमणार जोडी!!

ठळक मुद्देआधी ‘बोले चूडिया’ साठी सोनाक्षी सिन्हा आणि श्रद्धा कपूर या दोघींच्या नावांची चर्चा होती. पण सोना व श्रद्धा दोघींनाही मात देत मौनीने बाजी मारली

‘देने वाला जब भी देता है छप्पर फाड कर देता है,’ अशी एक हिंदी म्हण आहे. तूर्तास तरी मौनी रायला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. गतवर्षी अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ या चित्रपटातून मौनीचा दणकेबाज बॉलिवूड डेब्यू झाला. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर बक्कळ कमाईच केली नाही तर प्रेक्षक व समीक्षकांनीही या चित्रपटातील मौनीच्या अभिनयाचे कौतुक केले. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच मौनीने अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ साईन केला होता. यापाठोपाठ जॉन अब्राहमचा ‘रोमियो अकबर वॉल्टर’ आणि राजकुमार रावचा ‘मेड इन चायना’ हे दोन चित्रपटही तिच्या झोळीत पडले. हे चार चित्रपट साईन केल्यानंतर आता मौनीने आपला पाचवा चित्रपटही साईन केला आहे.


होय,  मौनी लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बोले चूडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. आश्चर्य म्हणजे, आधी या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा आणि श्रद्धा कपूर या दोघींच्या नावांची चर्चा होती. पण सोना व श्रद्धा दोघींनाही मात देत मौनीने बाजी मारली. मौनीने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली आहे. ‘मी या चित्रपटाची स्क्रिप्ट एकदाच वाचली आणि मी या स्क्रिप्टच्या प्रेमात पडले. तूर्तास मी या चित्रपटाबद्दल अधिक काही सांगू शकणार नाही. फक्त एकच सांगेल, चित्रपटातील ही मुलगी एक आत्मविश्वासू मुलगी आहे. ती ट्रॅक्टर चालवू शकते आणि डान्सही करू शकते,’ असे मौनीने सांगितले.

मी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अपोझिट काम करतेय, यावर अद्यापही माझा विश्वास बसत नाहीय. त्यांच्यासोबत काम करून मला खूप काही शिकायला मिळेल, असेही ती म्हणाली.
‘बोले चूडिया’  हा चित्रपट नवाजुद्दीनचा भाऊ शामस नवाब सिद्दीकी दिग्दर्शित करतोय. या चित्रपटाद्वारे शामस दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवतोय.

Web Title: mouni roy to star opposite nawazuddin siddiqui in bole chudiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.