Mirror Rajput's biggest disclosure for Bollywood debut! Read what !! | ​बॉलिवूड डेब्यूबद्दल मीरा राजपूतने केला आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा खुलासा! वाचा काय!!

आयफा2017 ने बॉलिवूड व बॉलिवूड प्रेमींना अनेक आनंददायी क्षण दिलेत. पण या क्षणांमध्ये सर्वाधिक खास ठरले ते शाहिद कपूरची बेटर हाफ मीरा राजपूत हिचे बयान. होय, मीरा राजपूत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. अद्याप मीरा वा शाहिद या दोघांपैकी यावर कुठलाही खुलासा केला नव्हता. पण आयफा अवार्डदरम्यान खुद्द मीराने याबाबतीत सर्वात मोठा खुलासा केला.


ALSO READ :  ​शाहीद कपूर व मीरा राजपूत करताहेत दुसऱ्या मुलाचे प्लानिंग!
एका पत्रकाराने मीराला तिच्या बॉलिवूड डेब्यूविषयी विचारले. येत्या काळात आम्ही तुला अभिनेत्री म्हणून पाहू शकतो का? असे मीराला विचारले गेले. यावर मीराचे उत्तर बºयाच अंशी सकारात्मक होते. होय,  बहुतांश वेळी तुम्ही मला शाहिदसोबतच पाहू शकतात. त्यामुळे बॉलिवूड डेब्यू सध्या दूर आहे, असे मीरा म्हणाली. बॉलिवूड डेब्यू सध्या दूर आहे, असे मीरा म्हणाली. याचा बॉलिवूड डेब्यूची चर्चा मीराने पूर्णपणे नाकारली नाही. म्हणजेच भविष्यात मीरा कॅमेºयापुढे येऊ शकते.  करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये मीरा व शाहिद एकत्र दिसले होते. या शोमध्ये मीरा कॅमेºयापुढे अतिशय आत्मविश्वासाने वावरताना दिसली होती.
बॉलिवूडबाहेरची असूनही मीराने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहिदची पत्नी म्हणून नव्हे तर मीरा राजपूत या नावाने तिला ओळखले जातेय. मीराचा इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही,यावर अनेकदा विश्वासही बसत नाही. मीरा व शाहिदच्या लग्नाला सुमारे दोन वर्षे झाली आहेत. या दोन वर्षांत शाहिदच्या आयुष्य आपले मानून मीरा चालली आहे. एकंदर काय तर पत्नीच्या भूमिकेत मीरा एकद फिट बसलीय. आता अभिनेत्री म्हणून ती पडद्यावरची भूमिका कशी वठवते, ते बघूच.
Web Title: Mirror Rajput's biggest disclosure for Bollywood debut! Read what !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.