Mirizia leaked too | मिर्झियाही झाला लीक

बॉलिवूड चित्रपट ऑनलाइक लीक होणे हे काही नवीन राहिलेले नाही. उडता पंजाब, ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटानंतर आता मिर्झियादेखील एका वेबसाईटवर नुकताच लीक झाला. पण ही गोष्ट दिग्दर्शक-निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या विरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर हा चित्रपट त्या वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला. याविषयी राकेश ओमप्रकाश मेहरा सांगतात, "मिर्झिया बनवण्यासाठी गेली कित्येक वर्षं मी मेहनत घेत आहे. त्यामुळे ही गोष्ट कळ्यावर मला प्रचंड धक्काच बसला होता. माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मला फोन करून, मेसेज करून हे कळवले आणि लगेचच मी त्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर चित्रपट वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला. पण दोन तास तरी हा चित्रपट त्या वेबसाईटवर होता. त्या दरम्यान जवळजवळ 10 लाख लोकांनी हा चित्रपट डाऊनलोड केला. चित्रपट बनवताना अनेक जण मेहनत करतात. अशाप्रकारे चित्रपट लीक करून कोणाला आनंद मिळतो हा मला नेहमीच प्रश्न पडतो. चित्रपटक्षेत्राशी किंवा चित्रपटांशी काहीही संबंध नसलेल्या लोकांचाच यामध्ये समावेश असतो असे मला अनेकवेळा वाटते. मलेशिया, पाकिस्तान किंवा भारतातील छोट्या राज्यातून चित्रपट लीक होत असल्याचे अनेकवेळा ऐकावयास मिळते. खरे तर मिर्झिया हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहाण्यात एक वेगळी मजा आहे. चित्रपटगृहात गेल्याशिवाय या चित्रपटाची भव्यता तुम्हाला अनुभवता येणार नाही. त्यामुळे हा चित्रपट लोकांनी चित्रपटगृहातच पाहावा असे मी त्यांना आवाहन करेन. मिर्झियाचे सध्या वेगवेगळ्या देशातील फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग होत आहे. सगळीकडे खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. मी नुकताच लंडनमधून परतलो आहे आणि आता बुसानला जाणार आहे. तेथील बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. त्यानंतर मी स्क्रिनिंगसाठी शिकागोला रवाना होणार आहे." 
Web Title: Mirizia leaked too
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.