ठळक मुद्देजॅकलिन फर्नांडिस ही खूपच चांगली आहे. ती कधीच कोणत्याही गोष्टीची मागणी करत नाही. तसेच ती नेहमीच विमानतळावरील सगळ्या स्टाफचे आभार मानते.

विमानतळाच्या बाहेर अनेकवेळा सेलिब्रेटींचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्स उभेच असतात. त्यामुळे विमानतळाच्या आत जाताना सेलिब्रेटी अतिशय नम्रपणे लोकांशी वागताना दिसतात. पण विमानतळाच्या आत गेल्यानंतर तेथील स्टाफशी, विमानातील स्टाफशी ते कशाप्रकारे वागतात हे तुम्हाला माहीत आहे का?

डीएनएच्या रिपोर्टनुसार, रेडिटवर नुकतेच एअरपोर्टवरील सिक्युरीटी ऑफिसर्सने नाव न सांगण्याच्या अटीवर आस्क मी एनिथिंग असा एक उपक्रम राबवला होता. या उपक्रमाच्या अंतर्गत लोकांनी त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटींविषयी अनेक प्रश्न त्यांना विचारले होते. त्यावर या अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे ऐकून तुमचे आवडते सेलिब्रेटी कसे आहेत हे तुमच्या लगेचच लक्षात येईल. या उपक्रमांद्वारे अनेक सेलिब्रेटींची पोलखोल झाली.

या उपक्रमाअंतर्गत ऑफिसर्सने दिलेल्या उत्तरानुसार कार्तिक आर्यन हा सगळ्यांशी मस्ती करतो तर जॅकलिन फर्नांडिस ही खूपच चांगली आहे. ती कधीच कोणत्याही गोष्टीची मागणी करत नाही. तसेच ती नेहमीच विमानतळावरील सगळ्या स्टाफचे आभार मानते. एकाने विचारले होते की, ज्या सेलिब्रेटींच्या पत्नी सेलेब्स नाहीत, त्या स्टाफशी कशाप्रकारे वागतात. यावर त्यांनी उत्तर दिले की, मीरा राजपूतच्या अजबच मागण्या असतात. एकदा तर तिने आमच्या एका स्टाफला नेलपेंट लावण्याविषयी विचारले होते. पण त्या स्टाफने नम्रपणे ही गोष्ट करण्यास नकार दिला होता. मात्र यावर मीरा चिडली नव्हती. 

एकाने बच्चन कुटुंबियांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले. जया बच्चन या काहीशा गोंधळलेल्या असतात. अभिषेक बच्चन चांगला आहे. ऐश्वर्या खूपच कमी बोलत असली तरी ती मनाने चांगली आहे. नव्या नवेलीला नेहमीच सिक्युरीटी हवी असते. मी कोण आहे हे माहीत आहे का अशाप्रकारची तिची वागणूक असते. 

मेकअपशिवाय सेलिब्रेटी कसे दिसतात असे विचारले असता त्यांनी सांगितले. विद्या बालन मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते. रेखा नेहमीच मेकअप करतात. पण एकदा त्यांनी मेकअप केलेला नव्हता. त्यावेळी त्यांना ओळखणे देखील कठीण झाले होते. दिशा पटानी, कियारा अडवाणी आणि श्रद्धा कपूर मेकअप शिवाय देखील छान दिसतात. 


 


Web Title: 'Mira Rajput has ridiculous demands', 'Kartik Aaryan is flirty': Airport staff reveals what happens once the paps leave
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.