#MeToo : लेखक सुहेल सेठ आणि मोहनवीणा वादक विश्व मोहन भट्ट यांच्यावरही आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:41 PM2018-10-11T12:41:54+5:302018-10-11T12:42:40+5:30

#MeToo: Writer Suhel Seth and Mohanwina player Vishwa Mohan Bhatt face accusation

#MeToo: Writer Suhel Seth and Mohanwina player Grammy winner Vishwa Mohan Bhatt face accusation | #MeToo : लेखक सुहेल सेठ आणि मोहनवीणा वादक विश्व मोहन भट्ट यांच्यावरही आरोप!

#MeToo : लेखक सुहेल सेठ आणि मोहनवीणा वादक विश्व मोहन भट्ट यांच्यावरही आरोप!

googlenewsNext

‘मी टू’मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तन आणि शोषणाचे आरोप झेलणा-यांच्या यादीत आता लेखक सुहेल सेठ आणि प्रसिद्ध मोहनवीणा वादक विश्व मोहन भट्ट यांचेही नाव चढले आहे.
सुहेल सेठ यांच्याविरोधात गैरतर्वनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी एक आरोप एका अल्पवयीन मुलीने केला आहे़



‘आपण १७ वर्षांचे असताना चाहती म्हणून ट्विटरवर सुहेल सेठ यांना फॉलो करत होते. पण एकदा त्यांनी मला त्यांच्यासोबत मद्यपान करण्याचे निमंत्रण दिले. तसेच अनेक लज्जास्पद मॅसेज पाठवले,’ असे या मुलीने म्हटले आहे. तिने या मॅसेजचे काही स्क्रिनशॉट्सही शेअर केले आहेत.  एका पत्रकार महिलेनेही सुहेल सेठवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एका इव्हेंटमध्ये मी माझ्या ग्रूप बॉयसोबत बोलत असताना सुहेल सेठ अचानक माझ्यावर आलेत आणि त्यांनी मला गालावर किस केले. मी त्यांना थांबवताच, ते आणि अन्य आजूबाजूचे सगळे माझी ती प्रतिक्रिया पाहून जोरजोरात हसू लागलेत. मी त्यावेळी  काहीही बोलले नाही. कारण मला करिअर बनवायचे होते़, असे या पत्रकार महिलेने म्हटले आहे. अन्य एका महिलेनेही अशीच आपबीती सांगितली आहे. गतवर्षी एका मोठ्या हॉटेलात सुहेल सेठ मला भेटले. ते माझ्या वडिलांचे मित्र होते़. मी त्यांना हॅलो म्हणायला गेले. आधी त्यांनी खूप गोड गप्पा केल्या. पण अचानक त्यांचे बोलणे सेक्स आणि आॅनलाईन डेटींगपर्यंत गेले. त्यानंतर सुहेलने मला अनेकदा आपल्या रूममध्ये बोलवले. पण मी गेले नाही, असे तिने लिहिले आहे.
दरम्यान सुहेल यांनी हे सगळे आरोप नाकारले आहेत. मी आरोप लावणाºयांना ओळखतही नाही. हे सगळे बकवास आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मोहनवीणा वादक विश्व मोहन भट्ट यांच्यावरही एका महिलेने गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. मुंबईच्या सुखनिध कौर असे या महिलेचे ना आहे. मी १४ वर्षांची असताना भट्ट यांनी आमच्या शाळेत परफॉर्मन्स केला होता. यावेळी मोहन भट्ट यांनी आपल्यासोबत छेडछाड केली होती, असे या महिलेने म्हटले आहे.

Web Title: #MeToo: Writer Suhel Seth and Mohanwina player Grammy winner Vishwa Mohan Bhatt face accusation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.