#MeToo : श्रुती हरिहरनने शेअर केली ‘मीटू’ स्टोरी! दाक्षिणात्य अभिनेता अर्जुन सरजावर केला गंभीर आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 01:01 PM2018-10-21T13:01:31+5:302018-10-21T13:01:39+5:30

साऊथची हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अभिनेत्री श्रुती हरिहरन हिने पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा करत आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे.

 #MeToo: South actress Sruthi Hariharan says #MeToo, accuses Arjun Sarja of "lewd" behaviour | #MeToo : श्रुती हरिहरनने शेअर केली ‘मीटू’ स्टोरी! दाक्षिणात्य अभिनेता अर्जुन सरजावर केला गंभीर आरोप!!

#MeToo : श्रुती हरिहरनने शेअर केली ‘मीटू’ स्टोरी! दाक्षिणात्य अभिनेता अर्जुन सरजावर केला गंभीर आरोप!!

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचविरोधात बोलणारी साऊथची हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अभिनेत्री श्रुती हरिहरन हिने पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा करत आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. स्वत:ची ‘मीटू’ स्टोरी शेअर करताना श्रुतीने साऊथचा लोकप्रीय अभिनेताअर्जुन सरजा याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.


अनेक हिट कन्नड चित्रपटांत दिसणाऱ्या श्रुती हरिहरनने ‘मीटू’ मोहिमेची पाठराखण करत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. २०१३ साली‘विस्मया’ या चित्रपटाच्या सेटवर आपल्यासोबत लैंगिक शोषण झाल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सेटवर ५० लोकांसमोर एका रोमॅन्टिक दृश्याच्या शूटींगदरम्यान त्याने माझ्याशी गैरवर्तन केले. या घटनेनंतर आपल्यावर शारिरीक आणि मानसिक आघात झाला, मात्र या परिस्थिती सावरत कशाप्रकारे या सर्वाचा सामना केला,असे सगळे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.


दरम्यान अर्जुनने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी आत्तापर्यंत ६० ते ७० अभिनेत्रींसोबत काम केले आहे. त्यांच्यापैकी कोणीच माझी तक्रार केली नाही. मी याविरोधात नक्कीच कायदेशीर कारवाई करेल, असे त्याने म्हटले आहे.
याच वर्षीच्या सुरूवातीला श्रुती हरिहरन कास्टिंग काऊचवरही बोलली होती. एका प्रोड्यूसरने फिल्म देण्याच्या मोबदल्यात या चित्रपटाच्या अन्य चार प्रोड्यूसरसोबत म्हणेल ते करण्याची अट माझ्यापुढे ठेवली होती, असा खुलासा तिने केला होता.

Web Title:  #MeToo: South actress Sruthi Hariharan says #MeToo, accuses Arjun Sarja of "lewd" behaviour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.