#MeToo: ‘प्यार का पंचनामा’फेम दिग्दर्शक लव रंजनही अडकला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:02 PM2018-10-12T12:02:53+5:302018-10-12T12:03:29+5:30

‘प्यार का पंचनामा’ फेम दिग्दर्शक लव रंजन हाही ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत छळ आणि लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकला आहे.

#MeToo: Pyaar Ka Punchnama director Luv Ranjan accused of sexual abuse by an aspiring actress | #MeToo: ‘प्यार का पंचनामा’फेम दिग्दर्शक लव रंजनही अडकला!

#MeToo: ‘प्यार का पंचनामा’फेम दिग्दर्शक लव रंजनही अडकला!

googlenewsNext

‘प्यार का पंचनामा’ फेम दिग्दर्शक लव रंजन हाही ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत छळ आणि लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकला आहे. एका अभिनेत्रीने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर लव रंजन यांच्या गैरवर्तनाला वाचा फोडली आहे.
२०१० मधील ही घटना असल्याचे या अभिनेत्रीने म्हटले आहे. त्यावेळी मी २४ वर्षांची होते. दोन मोठ्या चित्रपटांत मी छोट्याशा भूमिका केल्या होत्या आणि मला मोठ्या भूमिकेची प्रतीक्षा होती. कास्टिंग डायरेक्टर विकी सिदानाने मला कॉल केला होता. त्यावेळी ‘प्यार का पंचनामा’साठी आॅडिशन सुरू होते. या आॅडिशनसाठी मुलींना स्कट आणि टाईट टॉप घालून जायचे होते. मी पोहोचले तेव्हा तिने आधीच सात-आठ मुली होत्या. पण या संपूर्ण आॅडिशनदरम्यान कुणालाच डायलॉग वा अ‍ॅक्टिंग करायला सांगितले गेले नाही. हे लूक टेस्ट असावे असे आम्हाला वाटले. यानंतर बिकीनी टेस्ट झाली. यासाठी लव रंजन यांनी आणि सिनेमॅटोग्राफरने एकी-एकीला बोलवले. मी गेले तेव्हा  चित्रपटात एक किसींग आणि एक बिकीनी सीन असल्याचे लव रंजनने मला सांगितले. तू बिकीनीत कशी दिसते हे मला पाहायचे आहे,असे म्हणून त्याने मला अंतर्वस्त्रात  पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तू व्हर्जिन आहेस का? हस्तमैथून करतेय का? बॉयफ्रेन्ड आहे का? असे प्रश्नही त्यांनी मला विचारले. हे प्रश्न ऐकून मी तिथून जाण्याची परवानगी मागितली. यावर तू गैरसमज करू नकोस, असे लव रंजन मला म्हणाले, असे या अभिनेत्रीने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. या धक्कादायक घटनेनंतर मी अभिनेत्री बनण्याचा विचार पूर्णपणे सोडून दिला आणि विदेशात स्थायिक झाले, असेही या अभिनेत्रीने सांगितले आहे.
दरम्यान लव रंजन यांनी हे आरोप नाकारले आहेत.

Web Title: #MeToo: Pyaar Ka Punchnama director Luv Ranjan accused of sexual abuse by an aspiring actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.