#MeToo Effect: राजस्थान सरकारच्या कार्यक्रमातून कैलाश खेर बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 04:42 PM2018-10-28T16:42:44+5:302018-10-28T16:43:16+5:30

गायक कैलाश खेर याच्यावर एकापाठोपाठ एक अशा अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप ठेवले. या आरोपांमुळे एका म्युझिक इव्हेंटमधून कैलाश खेरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

 #MeToo Effect: singer kailash kher dropped from the diwali event after sexual harassment allegations | #MeToo Effect: राजस्थान सरकारच्या कार्यक्रमातून कैलाश खेर बाहेर!

#MeToo Effect: राजस्थान सरकारच्या कार्यक्रमातून कैलाश खेर बाहेर!

googlenewsNext

गायक कैलाश खेर याच्यावर एकापाठोपाठ एक अशा अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप ठेवले. या आरोपांमुळे एका म्युझिक इव्हेंटमधून कैलाश खेरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. होय, राजस्थान सरकारने उदयपूरमध्ये दिवाळी निमित्त होणाऱ्या एका म्युझिक इव्हेंटमधून कैलाश खेरचे नाव बाद केले आहे.
उदयपूर येथे येत्या ३० आॅक्टोबरला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘सिंगर नाईट’ या संगीत संध्येचे आयोजन होत आहे. यासाठी कैलाश खेरला निमंत्रित करण्यात आले होते. पण आता लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर आयोजकांनी त्याचे या इव्हेंटमधील सादरीकरण रद्द केले आहे. इंडिया टुडेशी बोलताना उदयपूरचे महापौर चंद्रसिंह कोठारी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. हा शासकीय कार्यक्रम आहे. यावरून कुठलाही वाद आम्हाला नको आहे. कैलाश खेरवरच्या आरोपानंतर त्याचे नाव या कार्यक्रमातून गाळण्याचा निर्णय आम्ही घेतलाय, असे त्यांनी सांगितले. त्याच्या जागी आता गायक दर्शल रावल या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. 

‘एका मुलाखतीदरम्यान कैलाश खेर माझ्या आणि माझ्या जर्नलिस्ट मैत्रिणीच्यामध्ये बसला होता व त्याचे हात सारखे आमच्या मांड्यांवरून फिरत होते,’ असा खुलासा या फोटो जर्नलिस्टने केला होता. या आरोपावर कैलाश खेर यांने खुलासाही केला होता. हे प्रकरण केव्हाचे आहे, मला आठवत नाही. काही गैरसमज झाले असतील तर मी माफी मागतो, असे तो म्हणाला होता. केवळ इतकेच नाही तर माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांना मी कसा आहे, हे ठाऊक आहे, असा छातीठोक दावाही त्याने केला होता. सुप्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा हिने कैलाश खेरवर गंभीर आरोप केले होते. ‘एका कॉन्सर्टच्या निमित्ताने मी कैलाशला पृथ्वी कॅफेमध्ये भेटले होते. आमच्या बँडने ताल धरला होता आणि नेहमीप्रमाणे कैलाशचा हात माझ्या मांडीवर होता. हात तसाच ठेवत, तू खूप सुंदर आहेस. बरे झाले तू कुण्या अभिनेत्याला न भेटता, एका सिंगरला(सोनाचा पती रामला उद्देशून) भेटलीस, असे तो मला म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकून मी लगेच तिथून निघून गेले, असे  सोना मोहपात्राने लिहिले होते. यानंतर  वर्षा सिंग धनोवा या गायिकेने त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले होते.

Web Title:  #MeToo Effect: singer kailash kher dropped from the diwali event after sexual harassment allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.